Video | मदत करायला गेला अन् अडकून बसला, आजीच्या आयडियाचे सगळीकडून कौतूक

सध्या इंटरनेटवर एका आजीचा व्हिडीओ धुमाकूळ घालतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Video | मदत करायला गेला अन् अडकून बसला, आजीच्या आयडियाचे सगळीकडून कौतूक
आजीबाई आणि तरुणाचा फोटो
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 12:17 AM

मुंबई : लोक समाजमाध्यमावर नेहमीच काहीतर खरमरीत शेअर करत असतात. याच कारणामुळे सोशल मीडियावरील वातावरण नेमहीच तापलेले असते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या इंटरनेटवर एका आजीचा व्हिडीओ धुमाकूळ घालतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. (grandmother funny video went viral social media)

आजीबाईंनी चांगलं डोकं वापरलं

या व्हिडीओमध्ये एका आजीबाईने चांगलंच डोकं लावलं आहे. यामध्ये आजीबाईने एक प्लास्टिकचे टोपले घेतलेले आहे. हे टोपले आजीबाईने घराच्या छताला लावलेले असून त्याला एका लोखंडी रॉडने पकडले आहे. त्यानंतर व्हिडीओतील आजीने तिच्या नातवाला मदतीसाठी हाक दिली आहे.

पहा व्हिडीओ :

नातवाच्या खिशावर आजीने डल्ला मरला

आवाज दिल्यानंतर थोड्या वेळाने एक तरुण घरातून आला आहे. त्याने आजीला मदत म्हणून छताला लावलेले प्लास्टिकचे टोपले पकडले आहे. नातवाने टोपले पकडल्यानंतर आजीबाई झरझर खाली उतरली आहे. खाली उतरताच प्लास्टिकचे टोपले धरून ठेवलेल्या नातवाच्या खिशावर आजीने डल्ला मरला आहे. आजीबाईने आपल्या नातवाच्या खिशातून एक मौल्यवान वस्तू काढली आहे. तसेच त्या वस्तूला बॅगमध्ये टाकून ही आजी पसार झाली आहे आणि बिचारा तरुण तसाच ताटकळत उभा आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, आजीबाई आणि तरुणाने हा व्हिडीओ शूट करुन त्यांच्या समाजमाध्यवरील अकाऊंटला शेअर केला आहे. लोक या मजेदार व्हिडीओला पाहून आनंदी झाले आहेत. तसेच या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रियासुद्धा देत आहेत.

इतर बातम्या :

Video | भर रस्त्यात तरुणाकडून किसची मागणी, चिडलेल्या तरुणीने पुढे काय केले ? पाहा व्हायरल व्हिडीओ

मोठा बंगला, 20 एकरात फार्महाऊस पाहिजे, पुन्हा म्हणते मुलगा ढेकर देणारा नसावा, तरुणीच्या अपेक्षेने भलेभले चक्रावले

Video | लग्न समारंभात जेवणावर मस्तपैकी ताव, तरुण समोर दिसताच झाली नाजुका, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

(grandmother funny video went viral social media)