
मेलबोर्न : चंद्रावर मानवाला राहण्यासाठी वस्ती निर्माण करण्याकरीता शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत. लवकरच चंद्रावर पहायला मिळणार हिरवळ पहायला मिळणार आहे. 2025 पर्यंत चंद्रावर झाडे उगवणार आहेत. यासाठी झाडांच्या बिया चंद्रावर पाठवल्या जाणार आहेत.
ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी चंद्रावर झाडे उगविण्यासाठी विशेष प्रकल्प विकसीत केला आहे. या संशोधनात वैज्ञानिकांना यश आल्यास मानवाचा चंद्रावर राहण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा आणखी वाढली आहे.
‘क्विन्सलँड युर्निर्व्ह टेक्नॉलॉजी’ मधील वनस्पती शास्त्रज्ञ ब्रेट विलियम मागील अनेक वर्षांपासून याबाबत संशोधन करत आहेत.
खासगी इस्त्रायली मिशनअंतर्गत बेरेशिट 2 या अंतराळ यान चंद्रावर पाठवले जाणार आहे. या यानातूच झाडाच्या बिया चंद्रावर पाठवणल्या जाणार आहेत.
यान चंद्रावर पोहोचल्यानंतर या बिया एका बंद चेंबरमध्ये ठेवल्या जाणार आहेत. त्यांना पाणी पुरविले जाणार आहे. त्यानंतर त्यांचे अंकुरणे व विकासावर नजर ठेवली जाणार आहे.
केवढ्या लवकर अंकुरित होतात, यावर बियांची निवड करण्यात येणार आहे. बिया अंकुरीत होऊन रोपटं उगवल्यास प्रतिकूल परिस्थितीत ते कसे जिवंत राहते यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
हे रोपटं उगवून याने चंद्राच्या जमीनीवर तग धरल्यास चंद्रावर ऑक्सिजन आहे का? येथील वातावरण जीव सृष्टीस राहण्यास योग्य आहे का अशा अनेक प्रश्नांचा उलगडा होणार आहे.
या संशोधनात यश आल्यास भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती स्थापन करण्यासाठीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या (University of Florida )वैज्ञानिकांनी ऐतिहासिक कामगिरी केली होती. नासाच्या (NASA)अपोलो मिशनच्या अंतराळवीरांनी ही चंद्रावरील माती पृथ्वीवर आणली होती. चंद्राच्या मातीत (sand on moon)रोपं उगवण्यात यश आले होते.