हे घर कसंय? 40 लाख रुपयांत पाचशे स्क्वेअर फुटांचे घर, आनंद महिंद्रा यांना सुद्धा आवडलंय

नुकतेच आनंद महिंद्रा यांनीही ते शेअर करत लिहिले की, सुमारे 40 लाख रुपयांत पाचशे स्क्वेअर फुटांचे फोल्डेबल घर आहे. हे भारतात स्वस्तात तयार केले जाऊ शकते.

हे घर कसंय? 40 लाख रुपयांत पाचशे स्क्वेअर फुटांचे घर, आनंद महिंद्रा यांना सुद्धा आवडलंय
portable home
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 15, 2023 | 4:58 PM

घर विकत घेणं हे कुणाचंही स्वप्न असतं, त्यासाठी लोक आपल्या आयुष्यातील भरपूर भांडवल खर्च करतात. त्यांना कधी यश मिळते तर कधी अपयश येते. दरम्यान, एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो घर खरेदी दारांसाठी स्वप्नासारखा ठरू शकतो. याला पोर्टेबल होम म्हटले जात आहे.

खरं तर हा व्हिडिओ अनेक युजर्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नुकतेच आनंद महिंद्रा यांनीही ते शेअर करत लिहिले की, सुमारे 40 लाख रुपयांत पाचशे स्क्वेअर फुटांचे फोल्डेबल घर आहे. हे भारतात स्वस्तात तयार केले जाऊ शकते. आपत्तीनंतर बांधण्यात येणाऱ्या निवाऱ्यांसाठी हे पूर्णपणे योग्य आहे, असेही त्यांनी लिहिले आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोक हे पोर्टेबल घर ट्रकसारख्या वाहनावर आणून एका जागी उभे करत आहेत. यानंतर शिडी आणि इतर वस्तू बसवून एक-एक करून ते उघडले जात आहे. काही लोक त्याची भिंत वाढवत आहेत, तर काही लोक त्याचा आतील भागही उलगडत आहेत. अल्पावधीतच त्याचे रुपांतर आलिशान बंगल्यात झाले.

या घराच्या आत अनेक सुविधा आहेत. बेडरूमपासून स्वयंपाकघरापर्यंतच्या खोल्या एकदम फ्रेश दिसतात. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच लोकांनी याबद्दल चर्चा सुरू केली आणि काही लोकांनी सांगितले की, भारतासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरू शकते.