चौदाव्या वर्षीचं त्यानं स्वतःच्या पैशाने घेतल्या कोट्यवधी रुपयांच्या कार, कसे कमविले कोट्यवधी रुपये ?

हाजिक हा स्वतः पैसे कमवत असून त्याला अलिशान कार खरेदी करून तीने प्रवास करायचा छंद आहे, यासाठी मात्र तो फारसे कष्टही घेत नाही.

चौदाव्या वर्षीचं त्यानं स्वतःच्या पैशाने घेतल्या कोट्यवधी रुपयांच्या कार, कसे कमविले कोट्यवधी रुपये ?
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 14, 2022 | 1:39 PM

मुंबई : जगात अनेक लॉक श्रीमंत आहे. त्यांच्या श्रीमंतीची अनेकदा चर्चा देखील होत असते. परंतु, श्रीमंतीची एकीकडे चर्चा होत असतांना 14 वर्षीय मुलाच्या श्रीमंतीची चर्चा होऊ लागली आहे. त्यातच अलिशान कारचे अनेक शौकीन असतात, त्यातही या 14 वर्षीय मुलाची चर्चा होऊ लागली आहे. या मुलांच्या वयावरुन त्याच्याकडे असलेल्या संपत्तीबाबत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हाजिक नसरी असं मलेशियामधील 14 वर्षीय मुलाचं नाव आहे. सध्या त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये हाजिक याने त्याच्याकडे असलेल्या महागड्या गाड्यांची खास झलक दाखवली आहे. त्यामध्ये लॅम्बोर्गिनी आणि रेंज रोव्हर यांसह विविध महागडया गाड्यांचा समावेश आहे. 14 वर्षीय हाजिक याने स्वतः या गाड्या खरेदी केल्या असून त्यासाठी लागणारे पैसे सुद्धा त्यानेच कमविले आहे.

विशेष म्हणजे तो 12 वर्षाचा असतांनाच त्याने रेंज रोव्हर स्पोर्ट ऑटोबायोग्राफी ही कार विकत घेतली होती. त्या कारची किंमत जवळपास दोन कोटीच्या घरात आहे.

हाजिक हा स्वतः पैसे कमवत असून त्याला अलिशान कार खरेदी करून तीने प्रवास करायचा छंद आहे, यासाठी मात्र तो फारसे कष्टही घेत नाही.

हाजिकने हे पैसे बिटकॉइनमधून कमावले असून सर्व पैसे त्याने क्रिप्टो मार्केटमधून कमावले आहेत. हाजिक हा 10 ते 12 वर्षापासूनच क्रिप्टो गुंतवणुकीत सक्रियपणे आहे.

हाजिकने तो दहा वर्षांचा असतांना पहिली आयुष्यातील कार खरेदी केली होती. क्रिप्टो मार्केटमध्ये जेव्हा तेजी आली होती तेव्हा ज्यांना फायदा झाला होता त्यापैकी एक हा हाजिक आहेत.

14 वर्षाचा असलेला हाजिक आपल्या अलिशान कारने प्रसिद्ध झाला असून सोशल मीडियावर त्याने स्वतः व्हिडिओ करत कारची झलक दाखवली आहे. येत्या काळात त्याला शेवरलेटची कॅमेरो खरेदी करणार आहे.

हाजिकला सोशल मीडियावर खून फॅन आहेत, टिकटॉकवर हाजिकला 44 हजार फॉलोवर्स असून 56 हजार जणांनी त्याचा कारचा व्हिडिओ पाहिला आहे.