Hospital Viral Video: रुग्णालयात वीजपुरवठा खंडित, मोबाईल टॉर्च सुरु करून रुग्णावर उपचार!
रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी रुग्णांवर एक तासापेक्षा जास्त काळ मोबाईल टॉर्चलाइटखाली उपचार करण्यात आले.

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलिया जिल्ह्यातील एका रुग्णालयात अचानक वीज गेल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. इतकंच नाही तर एक व्हिडीओ पाहिल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. या व्हिडिओत लाईट गेल्यामुळे डॉक्टर आणि नर्स रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोबाईल टॉर्चचा (Mobile Torch) वापर करताना दिसलेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे. मुसळधार पावसामुळे बलिया जिल्ह्यातील रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी रुग्णांवर एक तासापेक्षा जास्त काळ मोबाईल टॉर्चलाइटखाली उपचार करण्यात आले.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला हॉस्पिटलच्या स्ट्रेचरवर एक महिला दिसेल. एक माणूस टॉर्च घेऊन उभा आहे.
मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात डॉक्टर रुग्णाची तपासणी करीत आहेत. याच व्हिडिओत इतर रुग्ण अंधारात बसलेले दिसतात.
व्हायरल व्हिडीओ
बलिया ज़िला अस्पताल में मोबाइल टार्च की रोशनी में हो रहा मरीज़ का इलाज, विडियो इमरजेंसी वार्ड की बताई जा रही है. pic.twitter.com/h3wi3tZn0H
— priya singh (@priyarajputlive) September 12, 2022
याबाबत बोलताना जिल्हा रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन आणि प्रभारी हेड-इन-चार्ज डॉ. आर. डी. राम म्हणाले, “जनरेटरसाठी बॅटरी नसल्यामुळे 15-20 मिनिटे गडबड झाली होती.
डॉ. आर.डी. राम यांनी दावा केला की रुग्णालयात बॅकअपसाठी जनरेटर आहे परंतु बॅटरी मिळण्यास वेळ लागला. जनरेटरमधून बॅटरी का काढली जाते, असा प्रश्न लोकांना पडला.
यावर डॉक्टरांनी अजब उत्तर दिलं. ‘बॅटरी चोरीची भीती नेहमीच असते.जनरेटर मधून बॅटरी हटवली जाते.’ असे सांगून ते म्हणाले की, या घटनेवर राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
