
World Hottest Police Officer: जगभरातील पोलीस विभाग शिस्त आणि शौर्यमुळे ओळखले जातात. जे देशातील कायदे व्यवस्था राखण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या कठोर कामामुळे, पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना सामान्यतः असभ्य आणि गर्विष्ठ मानलं जातं. परंतु अमेरिकेतील एक महिला पोलिस अधिकारी ही प्रतिमा मोडत आहे आणि तिच्या ग्लॅमरस लूक आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध होत आहे. या महिला पोलीस अधिकारी कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांना जगातील सर्वात हॉट पोलीस अधिकारी म्हणून देखील ओळतात.
एवढंच नाही तर, लोकं या महिला पोलिस अधिकाऱ्याचा शोध घेत असतात आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात. तर आज जाणून घेऊ या पोलीस अधिकारी कोण आहे आणि सर्वत्र प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत…
जगातील सर्वात सुंदर पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या महिलेचं नाव एंड्रेडे (Detective De Andrade) असं आहे. एंड्रेडे फ्लोरिडा पोलिसात एक गुप्तहेर अधिकारी आहेत. त्या आता हॉलिवूड पोलिस विभागाचा एक लोकप्रिय चेहरा बनल्या आहेत. पोलिसांच्या गणवेशातील त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडिओमध्ये त्या लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाताना नियमांचे पालन करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.
रिपोर्टनुसार, फ्लोरिडा पोलिस विभागाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एंड्रेडे लोकांना सुट्टीच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर जाताना नियमांचे पालन करण्याचं आवाहन करताना दिसत आहे. समुद्रकिनारी गेल्यानंतर काय करायला हवं आणि काय करू नये… याबद्दल सांगताना दिसत आहे. तर पोलिसांना सहकार्य करा… असं देखील एंड्रेडे सांगत असतात.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये, डिटेक्टिव्ह एंड्रेडे अग्निशमन निरीक्षक रामोससोबत दिसत आहे. या दरम्यान, ते लोकांना 4 जुलै रोजी हॉलिवूड बीचवर फटाके आणि स्पार्कलर न जाळण्याचा इशारा देतात. व्हिडीओमध्ये एंड्रेडे, रामोस याला म्हणतात, ”आम्ही तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की हॉलीवूड बीच आणि ब्रॉडवॉकवर फटाके वाजवण्यास परवानगी आहे. यावर फक्त बंदी नाही तर, धोकादायक देखील आहे. फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत होणे आणि इतर गंभीर अपघात होऊ शकतात. ज्यामुळे लोकांना धोका निर्माण होऊ शकतो.’ हा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
फ्लोरिडा पोलिस विभागाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एंड्रेडे यांचे अनेक व्हिडीओ आहेत. ज्यामध्ये एंड्रेडे वेगवेगळ्या परिस्थितीत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत असतात. संकटात अडकलेल्या इतरांना मदत करण्याचं मार्ग सांगतानाचे देखील अनेक व्हिडीओ आहेत. एवढंच नाही तर, उष्णता वाढल्यास मुलांना आणि पाळीव प्राण्यांना गाडीत सोडू नका असे लोकांना सांगतानाही दिसत आहेत.