रेशम टिपणीस हिच्या मुलाच्या आत्महत्या अफवा, संताप व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, ‘ज्याने केलंय त्याला…’
Resham Tipnis on Son: मुलाच्या आत्महत्याच्या अफवा पसरवणाऱ्यावर भडकली रेशम, संतापात म्हणाली, 'माझा लेक ठणठणीत आहे. पण ज्याने हे केलंय त्याला...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा...

Resham Tipnis on Son: अभिनेत्री रेशम टिपणीस हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत रेशम हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता रेशम कोणत्या सिनेमा किंवा मालिकेमुळे नाही तर एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. रेशम टिपणीस हिच्या मुलानं आत्महत्या केल्याची अफवा पसरल्यानंतर अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. असं कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई होईल… असा इशारा देखील अभिनेत्री दिला आहे. सध्या रेशम हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, गुजराती अभिनेत्रीच्या मुलाने 56 व्या मजल्यावरून उडी मारून स्वतःला संपवलं आहे. वयाच्या 8 व्या वर्षी अभिनेत्रीच्या मुलाने टोकाचा निर्णय घेतला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. संबंधित घटना बुधवारी संध्याकाळी कांदिवली याठिकाणी घडली. आईने शिकवणीस जायला सांगितल्यानंतर राग आलेल्या मुलाने 56 व्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आहे.
दरम्यान, घटनेमुळे खळबळ माजलेली असताना एका वेब पोर्टलनं रेशम आणि तिच्या मुलाचा फोटो पोस्ट करत बातमी व्हायरल केली. रेशम आणि तिच्या मुलाचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला… या प्रकारानंतर रेशम हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

पोस्ट शेअर करत रेशम म्हणाली, ‘माझ्या लेकाबद्दल खोटी बातमी पसरवली जात आहे. कृपया दुर्लक्ष करा… बाप्पाच्या आशीर्वादानं माझा मुलगा मानव ठणठणीत आहे. पण ज्याने कोणी हे केलंय, त्याच्यावर कडक कारवाई होणार हे नक्की…’ सध्या रेशमची पोस्ट व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीच्या मुलाचे टोकाचे पाऊल
अभिनेत्री आईने ट्यूशनल जाण्यास सांगितल्यावर भडकलेल्या मुलाने राहत्या इमारतीच्या 57 व्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि आयुष्य संपवत आत्महत्या केली. संतापाच्या भरात त्याने हे टोकाचं पाऊल उचलून जीव दिल्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला असून त्याच्या या अकस्मात मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडूम मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडे Siddha Seabrook नावाची एक हाय प्रोफाईल इमारत आहे. सदर मुलगा हा त्याच इमारतीमध्ये रहात होता. त्याची आई ही गुजराती टीव्ही मालिकांमध्ये काम करते. नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या एका पुरूषासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते. अभिनेत्री आणि तिचा मुलगा कांदिवलीतील आलिशान घरात नुकताच शिफ्ट झाले होते.
