AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | या चित्रात कोल्हे शोधून दाखवा!

ऑप्टिकल भ्रमाचे फोटो खूप अवघड असतात. हे आपलं मनोरंजन करता-करता आपल्या मेंदूचा व्यायाम देखील करवून घेतात. ऑप्टिकल भ्रम सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतायत. एक हंगेरियन कलाकार आहे ज्याचे ऑप्टिकल भ्रम सोडवताना माणूस अक्षरशः गोंधळून जातो. याच कलाकाराचं एक चित्र व्हायरल होतंय. यात तुम्हाला कोल्हे शोधायचे आहेत. बघा, लावा जोर...सांगा दिसतायत का कोल्हे...

Optical Illusion | या चित्रात कोल्हे शोधून दाखवा!
optical illusion find the foxImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 18, 2023 | 8:54 PM
Share

मुंबई: जर तुम्हीही ऑप्टिकल इल्युजन किंवा ब्रेन टीझरचे फॅन असाल तर तुम्ही डुडासला चांगल्या प्रकारे ओळखत असाल. होय, ऑप्टिकल इल्युजन फोटो बनविण्यात माहिर असलेला हंगेरियन कलाकार डुडास! नुकताच त्याने फेसबुकवर ब्रेन टीझरचा नवा फोटो शेअर केला आहे, ज्याने जगभरातील पझल प्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. नव्या चॅलेंजमध्ये त्यांनी लोकांना पांडा असणाऱ्या फोटोंमध्ये तीन कोल्हे शोधण्याचे काम दिले आहे. हे काम नेहमीप्रमाणेच सोपे नाही.

भुश्यामध्ये सुई शोधण्यासारखे

डुडासांचा हा भ्रम तुम्ही चुटकीसरशी मोडून काढू शकता असे वाटत असेल तर समजून घ्या की तुम्ही प्रतिभावंत आहात. हा टीझर अधिकच आव्हानात्मक आहे कारण कोल्ह्याचा रंग अगदी पांडासारखा आहे. अशा वेळी कोल्हे शोधणे म्हणजे भुश्यामध्ये सुई शोधण्यासारखे होईल. बरं, बघुया तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत. 10 सेकंदात कोल्हे सापडतील की नाही?

या कठीण आव्हानावर तुम्ही मात कराल

आजचं काम थोडं अवघड आहे. आपण नक्कीच हे चित्र बघून डोकं खाजवत असाल आणि विचार करत असाल हे आम्हाला माहीत आहे. कारण या प्राण्यांचा रंग अगदी सारखाच आहे. मात्र, या कठीण आव्हानावर तुम्ही मात कराल, असे आम्हाला वाटते. हा ब्रेन टीझर फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हजाराहून अधिक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. याशिवाय या मनोरंजक चॅलेंजवर पझलप्रेमी सक्रियपणे कमेंट्स करत आहेत.

खाली उत्तर दिलंय

कोल्हे ओळखले असतील तर अभिनंदन, तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण आहे. जे लोक अजूनही त्यांचा शोध घेत आहेत त्यांच्यासाठी आम्ही खाली चित्र देत आहोत. खाली उत्तर दिलंय बघा.

here are the fox

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.