लोक म्हणाले- प्रेम असावं तर हे असं!

सोशल मीडियावर खळबळ माजवणारे एक चित्र म्हणजे सुश नावाच्या मुलीने माफी मागण्याचा एक नवा मार्ग शोधला आहे. तिने आपल्या मित्राची माफी मागण्यासाठी नोएडामध्ये एक मोठा होर्डिंग लावला. होय, नोएडातील एका खूप मोठ्या होर्डिंगवर 'सॉरी' असं लिहिलं आहे.

लोक म्हणाले- प्रेम असावं तर हे असं!
Sorry message on flex
| Updated on: Jun 28, 2023 | 12:20 PM

नवी दिल्ली: आपल्या प्रियजनांची माफी मागण्यासाठी कोण काय काय करू शकतं? फुले, चॉकलेट्स आणि हृदयस्पर्शी मेसेजेस हे तर विसरून जा, कारण आता इंटरनेटचा जमाना आहे आणि यात ज्यांना माफी मागायची आहे त्यांच्यात जोरदार स्पर्धा सुरु असते. लोक वेगवेगळ्या पद्धती शोधून काढतायत. त्यांच्यासाठी मर्यादा उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर खळबळ माजवणारे एक चित्र म्हणजे सुश नावाच्या मुलीने माफी मागण्याचा एक नवा मार्ग शोधला आहे. तिने आपल्या मित्राची माफी मागण्यासाठी नोएडामध्ये एक मोठा होर्डिंग लावला. होय, नोएडातील एका खूप मोठ्या होर्डिंगवर ‘सॉरी’ असं लिहिलं आहे.

ट्विटरवर व्हायरल

या आठवड्यात एका मोठ्या होर्डिंगने लक्ष वेधून घेतल्याने नोएडावासीय हैराण झाले होते. या फलकावर ठळकपणे सर्वांना पाहता येईल, असे लिहिले आहे, ‘मला माफ कर संजू. मी तुला पुन्हा कधीच दुखावणार नाही- सुश.” बोर्डावर तुम्ही पाहू शकता की त्यावर दोन मुलांचे बालपणीचे फोटो आहेत. मात्र, बालपणीचा फोटो लावल्याने दोघांची ओळख पटली नाही. या होर्डिंगचा फोटो सोशल मीडियावर येताच तो लगेच ट्विटरवर व्हायरल झाला.

2 लाखांहून अधिक व्ह्यूज

@uDasKapital हँडलसह एका ट्विटर वापरकर्त्याने सांगितल्यानुसार, नोएडाच्या सेक्टर 125 ओखला पक्षी अभयारण्य मेट्रो स्टेशनजवळ हा होर्डिंग लावण्यात आला आहे. ये-जा करणारे लोक त्याचा फोटो क्लिक करून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून लोक त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका पोस्टला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.