IAS Officer: कलेक्टरने सांगितलं यशस्वी जीवनाचं रहस्य!

अनेकदा आपण यामागे नशिबाला दोष देतो, पण असं नाही.

IAS Officer: कलेक्टरने सांगितलं यशस्वी जीवनाचं रहस्य!
Awanish sharan tweet
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 15, 2022 | 6:08 PM

आयुष्यात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे असते. चांगल्या जीवनाच्या इच्छेसाठी प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात मेहनत घेतो. आपल्या मेहनतीने स्वत:ला यशस्वी करणारे अनेकजण आहेत, तर कष्ट करूनही यश न मिळवू शकणारे अनेक जण आहेत. अनेकदा आपण यामागे नशिबाला दोष देतो, पण असं नाही. खरं तर आपण आपल्या आयुष्याचा विचार करतो तितकं आयुष्य सोपं नसतं कारण आपल्या आयुष्याबद्दल आपण जसा विचार करतो तशी योजना देवाकडे असतेच असं नाही..! यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आयएएस अधिकाऱ्याने एक फोटो शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेला फोटो आपल्याला सांगतो की आपण आपले जीवन सोपे समजतो परंतु आपल्याला तोच मार्ग मिळेल असं नाही कारण देवाची इच्छा वेगळी असू शकते.

देवाची इच्छा असते की आपण कठीण मार्गावरून जावे आणि मजबूत व्हावे. सतत प्रयत्न करून आपण एक दिवस नक्कीच यशस्वी होऊ शकू.

व्हायरल होणारा हा फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याला पाच हजारांहून अधिक लाईक्स आणि पाचशेहून अधिक रि-ट्वीट्स मिळाले आहेत. लोक यावर कमेंट करत आहेत आणि त्यावर आपला फीडबॅक देत आहेत.