AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार, पार्थ पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर रोहित पवार यांचे मोठे विधान, थेट म्हणाले, पवार कुटुंब..

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकासाठी जागेची पाहणी पवार कुटुंबियांकडून केली जात आहे. आजच त्यासंदर्भातील बैठक पार पडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबद्दल रोहित पवार यांनी मोठे भाष्य केले.

शरद पवार, पार्थ पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर रोहित पवार यांचे मोठे विधान, थेट म्हणाले, पवार कुटुंब..
Rohit pawar
| Updated on: Feb 06, 2026 | 8:08 AM
Share

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये त्यांच्या काही सभा असल्याने मुंबई विमानतळाहून सकाळी 8.15 ला ते निघाले होते, बारामतीच्या धावपट्टीजवळ 8.45 ला त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगनात अंत्यसंस्कार करण्यात आली. आता त्याचठिकाणी अजित पवार यांचे स्मारक उभारले जाणार आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंब एकत्र आल्याचे बघायला मिळतंय. रोहित पवार, युगेंद्र पवार आणि जय पवार अजित पवार यांच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतानाही दिसत आहेत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यात नुकताच चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली.

यादरम्यान माध्यमांसोबत बोलताना आमदार रोहित पवार यांनी म्हटले की, घाईघाई विमानाने ते निघाले आणि ही दुर्देवी घटना घडली. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अजित पवार ज्या विचारांना पुढे घेऊन जात होते, त्या विचारांना लोकांनी पाठिंबा द्यावा. राजकारणातील मोठे नेते अजित पवार होते. राजकीय दृष्टीकोनातून जर तुम्हाला त्यांना आदरांजली द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथे जिथे उभे आहेत, तिथे लोकांनी त्यांना सहकार्य करावं.

असे मी पवार परिवाराच्या वतीने बोलेल. पवार परिवारालाही या दु:खद घटनेमुळे आणि या घटनेमुळे प्रचाराला कुठेही जाता आले नाही. त्यामुळे लोकच त्याबाबत समजून घेतील असे वाटते. आमच्या कुटुंबामध्ये कायमच पवार साहेब हे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. जेंव्हा केंव्हा परिवाराला आवशक्ता असते, त्यावेळी पवार साहेब कायमच कुटुंबासोबत भक्कमपणे उभे राहिले आहेत.

आज अजित पवार नसताना पवार साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. पार्थ, काकी, जय आणि आमच्या सर्वांचेच मत आहे की, अजित दादांचे चांगले स्मारक व्हावे. त्या दृष्टीकोनातून योग्य जागा कोणती जिथे लोकांना येता येईल भेटता येईल, बघता येईल आणि दर्शन घेता येईल, कारण अजित काकांचे काम 35 ते 40 वर्षांचे राजकारणातील होते, असेही रोहित पवार यांनी यावेळी म्हटले.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...