‘बॉस’ हवा तर..असा, स्वतःच्‍या पैशांनी कर्मचाऱ्यांना करवली मौज! परदेशात साजरा केला वर्किंग-हॉलिडेचा आनंद..

| Updated on: Jul 10, 2022 | 11:37 AM

एका ऑफिसच्या बॉसने त्याच्या कर्मचाऱ्यांना चक्क पगारी सहलीचा सुखद आनंद दिला आहे. विशेष म्हणजे हा सर्व खर्च बॉसने केला. लक्झरीयस सुविधा, मौजमजेसह लोक ऑफिसची कामेही करत होते. त्यांनी या सहलीला ‘वर्किंग हॉलिडे’ असे नाव दिले आहे. म्हणजेच काम करा, फिरा आणि आनंद लूटा.

‘बॉस’ हवा तर..असा, स्वतःच्‍या पैशांनी कर्मचाऱ्यांना करवली मौज! परदेशात साजरा केला वर्किंग-हॉलिडेचा आनंद..
Follow us on

मुंबईः एक दिवस तुमचा बॉस उठतो आणि म्हणतो की, कंपनी तुम्हाला एका मोठ्या सहलीवर घेऊन जातेय. जेथे धबधब्यासह थंड रिसॉर्टमध्ये तुमची राहण्याची व्यवस्था (Accommodation) असेल आणि स्विमींग पूलमध्ये आनंद लूटताना तुम्हाला कॉकटेलचा आस्वाद घेता येईल. इतकंच नाही तर, या संपूर्ण व्यवस्थेचा खर्च (Cost of arrangement) बॉस स्वतः उचलेल विशेष म्हणजे ही तुमची पगारी सहल असेल. हे सर्व ऐकून तुम्हाला स्वप्नात असल्या सारखे वाटले असेल. पण, प्रत्यक्षात एका बॉसने तसेच केले आहे. सिडनीस्थित एका ऑस्टेलियन कंपनीच्या बॉसने आपल्या संपूर्ण टीम ला इंडोनेशियाच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘बाली’ येथे पगारी सहलीवर (On a paid trip) नेले. एक मार्केटिंग फर्म असणाऱ्या ‘सूप’ एजन्सीच्या बॉसने घडवलेल्या या आगळ्या वेगळ्या सहलीदरम्यान कर्मचाऱ्यांची एका आलिशान व्हिलामध्ये सर्व व्यवस्था करण्यात आली होती.

14 दिवसांचा वर्किंग हॉलिडे

चौदा दिवसांच्या या सहलीत, कर्मचाऱ्यांनी पोहणे, स्नॉर्कलिंग आणि क्वाड-बाईक रायडिंग यांसारख्या विविध सांघिक खेळांचा आनंद घेतला. जेणेकरून कर्मचाऱ्यांनी सांघिक एकनिष्ठेने कामात स्वतःला झोकून द्यावे हा त्या मागचा उद्देश होता. सूप कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, ‘कात्या वाकुलेन्को’ यांनी या 14 दिवसांच्या वर्किंग हॉलिडेचे वर्णन करताना, एजन्सी लाँच झाल्यापासून सर्वोत्कृष्ट संघ-निर्माण अनुभव असल्याचे नमुद केले आहे. ते, म्हणाले- कामाच्या ठिकाणी आपण संघ म्हणून एकत्रित काम करणे आवश्यक आहे. काम करताना असो किंवा काम संपल्यानंतर, संघभावना दृढ होणे गरजेचे आहे.

व्हिलामध्येच झाल्यात मिटींग्स

कात्या पुढे म्हणाले- कोविड-19 ने आपल्याला काम करण्याच्या नवीन पद्धती शिकवल्या आहेत आणि आम्ही कुठूनही काम करू शकतो. म्हणूनच आज आम्ही सांघिक कार्य एका नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे.

या ‘वर्किंग हॉलिडे’च्या व्हिडिओ शूट मध्ये कर्मचारी ताज्या ‘सी-फूड’चा आस्वाद घेताना दिसत आहेत. ते, योगा क्लासेसपासून ते सूर्योदया पासून कॉकटेलचा आनंद घेताना आणि व्हिलामध्ये विवीध मिटींग्स्‌ मध्ये सहभागी होताना दिसतात.

वेगवेगळ्या विभागातील सहकारी पहिल्यांदाच एकत्र काम करत होते. या कामकाजाच्या सुट्टीत, टीमने एका सहकर्मचार्याचा वाढदिवसही साजरा केला. ‘कुमी-हो डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ‘कुमी-हो’ म्हणाले की, संपूर्ण एजन्सी एकत्रित काम करताना, संवाद साधत आणि सहयोग करताना पाहून संपूर्ण टीमला फ्रेश झाल्यासारखे वाटत होते. हा नक्कीच आयुष्यभराचा अविस्मरणीय अनुभव होता, जो मी कधीच विसरणार नाही. या काळात आमच्या टीमने खूप प्रोडक्टीव काम केले. आमचा संघ कामाचा ताण-तणाव योग्य रित्या हाताळून या आयलँडवर निश्चींत होता.

सोशल मिडीयावर चर्चा

या यशस्वी ‘वर्किंग हॉलिडे’ च्या सुट्टीनंतर कंपनीने अशाच आणखी एका सहलीचे नियोजन सुरू केले आहे. यावेळी कंपनीने युरोपमध्ये वर्किंग हॉलिडे आयोजित करण्याची योजना आखली आहे. सध्या सोशल मिडियावर लोक त्यांच्या बॉसचे कौतुक करत आहेत. एका यूजरने म्हटले- बॉस हो…तो, एैसा. दुसरा यूजर म्हणाला- मला या कंपनीत नोकरी मिळेल का?