बापरे! या भागात लपले होते 7088 कोब्रा, पाहून सर्पमित्रालाही फुटला घाम

7088 कोब्रा प्रजातीतल्या सापांचा बचाव करण्यात आला आहे. पावसाळ्यात साप मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. ऑगस्ट हा सापांसाठी सर्वात अनुकूल महिना मानला जातो. सापांचा बचाव करणाऱ्या संस्थेने यासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

बापरे! या भागात लपले होते 7088 कोब्रा, पाहून सर्पमित्रालाही फुटला घाम
Snake
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 18, 2025 | 1:04 PM

पावसाळ्यात साप आपल्या बिळातून बाहेर येतात. तेलंगणात सध्या सर्पमित्र सापांचा सातत्याने बचाव करत आहेत. सापांची संख्या इतकी प्रचंड आहे की, बचाव करणाऱ्यांनाही घाम फुटला आहे. फ्रेंड्स ऑफ स्नेक्स सोसायटी (FoSS) च्या स्वयंसेवकांनी आतापर्यंत 7088 कोब्रा प्रजातीतल्या सापांचा बचाव केला आहे. या प्रजातीतले साप जून ते सप्टेंबर या काळात अंडी घालतात. जानेवारी ते जून या कालावधीत त्यांनी 5954 सापांचा बचाव केला, त्यापैकी 2970 पेक्षा जास्त साप हे चश्माधारी कोब्रा होते. जून ते 16 जुलै या कालावधीत आणखी 1134 सापांचा बचाव करण्यात आला.

सुमारे एक आठवड्यापूर्वी, या संस्थेने स्वयंसेवक आदित्य श्रीनाथ यांनी जगद्गिरिगुट्टा येथे 23 साप आणि एक प्रौढ चश्माधारी कोब्रा यांचा बचाव करण्यासाठी 12 तासांपेक्षा जास्त वेळ घालवला. हे साप एका घराच्या आणि परिसरातील भिंतीदरम्यानच्या काँक्रीटच्या फरशीतल्या छोट्या फटीतून आत-बाहेर करताना आढळले.

वाचा: चक्क नाग गळ्यात अडकून बाइकवरुन चालला होता, वाटेतच होत्याचं नव्हतं झालं

हिंदुस्तान टाइम्सच्या मते, श्रीनाथ यांनी सांगितलं, “जमीन पोकळ होती आणि सापांना अंडी घालण्यासाठी ती एकदम योग्य जागा होती. मी सायंकाळी सातच्या सुमारास तिथे पोहोचलो आणि पहाटे तीन वाजेपर्यंत 19 सापांचा बचाव केला. दुसऱ्या दिवशी मी परत गेलो आणि उरलेल्या पाच सापांचाही बचाव केला.” उस्मानिया विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि जैवविविधता व संरक्षण अभ्यास केंद्राचे संचालक चेल्मेला श्रीनिवासुलु यांनी सांगितलं, “चश्माधारी कोब्राचा प्रजनन काळ जानेवारी ते एप्रिल असतो आणि ते मार्च ते जुलै या काळात अंडी घालतात. अंड्यांचा उष्मायन काळ 45 ते 70 दिवसांचा असतो.” ते पुढे म्हणाले, “ऑगस्ट हा अंडी घालण्यासाठी सर्वात उत्तम महिना आहे.”

साप जास्त दिसू लागले

पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस फारसा पडलेला नाही. सोसायटीचे महासचिव अविनाश विश्वनाथम यांनी सांगितलं की, कमी पावसामुळे लोकांना साप जास्त दिसू लागले आहेत. गैर-नफा संशोधन संस्था, कलिंगा फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त पी. गौरी शंकर यांनी सांगितलं, “पावसाळ्यात फक्त सापच नव्हे, तर बेडूक, टोड, उंदीर आणि इतर कीटकही मोठ्या प्रमाणात अंडी घालतात.”