Video: चक्क नाग गळ्यात गुंडाळून बाइकवरुन चालला होता, वाटेतच होत्याचं नव्हतं झालं
एका साप पकडणाऱ्या व्यक्तीचा विषारी कोब्राला गळ्यात गुंडाळून बाइक चालवताना मृत्यू झाला. या व्यक्तीचं नाव दीपक महावर असं होतं. पण रस्त्यात होत्याचं नव्हतं झालं.

सापाचे नाव जरी घेतले तरी भल्या भल्यांचा थरकाप उडतो. अनेकजण जिथे साप आहे तेथून कोसो दूर पळतात. पण काही जण असे आहेत जे सापाला फार घाबरत नाहीत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क सर्वात विषारी साप गळ्यात गुंडाळून बाइकवरुन चालला होता. पण बाइकवरुन जात असताना होत्याचं नव्हतं झालं. नेमकं काय झालं जाणून घ्या…
काय आहे व्हिडीओ?
मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात ही प्रकार घडला आहे. साप पकडणारा दीपक महावर गळ्यात कोब्रा गंडाळून बाइकवरुन चालला होता. दीपक जेपी कॉलेजमध्ये तात्पुरत्या कर्मचाऱ्याच्या रूपात काम करत होता आणि तो सापांना वाचवण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याने हजारो सापांचे प्राण वाचवले होते, असं सांगितलं जातं. नुकतंच त्याने एक नाग पकडला होता आणि त्याला काचेच्या भांड्यात ठेवलं होतं, येणाऱ्या श्रावण महिन्याच्या मिरवणुकीत प्रदर्शनासाठी.
सैकड़ों लोगों को सांपों से बचाने वाले राघौगढ़ के स्नेक कैचर दीपक महाबर की सर्पदंश से मौत। रेस्क्यू के बाद सांप को गले में डाल बेटे को स्कूल लेने निकले थे, लौटते वक्त सांप ने काटा। जिसने बचाया, वही ज़हर काल बन गया। pic.twitter.com/mQK9r6oaAp
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) July 17, 2025
नेमकं काय घडलं?
घटना घडली त्या दिवशी, दीपकने आपल्या मुलांना शाळेत सोडताना कोब्राला गळ्यात हारासारखं गुंडाळलं होतं. त्यानंतर अचानक कोब्राने त्याला दंश केला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याला विषरोधक औषध देण्यात आलं होतं, पण वैद्यकीय मदत मिळण्यास उशीर झाल्याने ते प्रभावी ठरलं नाही. या घटनेपूर्वी एका व्यक्तीने दीपकचा कोब्रा गळ्यात गुंडाळून फिरताना रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीपकच्या पश्चात त्यांची दोन मुलं, रौनक (१२) आणि चिराग (१४), अनाथ झाले आहेत. त्याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.
