
लोक बाजारात वांगी – बटाटे घेतल्याप्रमाणे नोटांची पुंडकी किलोवर विकत घेत आहेत अशी कल्पना तुम्ही कधी केली आहे का ? तुम्हाला वाटत असेल की तुमची चेष्टा मस्करी सुरु आहे. या देशात रस्त्याच्या कडेला फेरीवाले नोटा विकत असतात आणि ग्राहक पिशव्या भरुन भाजी आणल्याप्रमाणे नोटांच्या गट्टा विकत घेऊनघ घरात नेतात. हे काही कल्पनेचे पतंग नाहीत असा देश जगाच्या नकाशावर आहे. सोमाली लँडची राजधानी हरगीसाची ही हकीकत आहे.
सोमाली लँडची राजधानी हरगीसा येथे अनोखे ‘मनी मार्केट’ हायपरइन्फ्लेशनचे शिकार झाले आहेत. जेथे लोकल करन्सी सोमालीलँडचे शिलिंग (SLSH) ची किंमत इतकी घसरली आहे. त्यामुळे पैसे स्वत:च कमोडिटी बनली आहे.
एका अमेरिकन डॉलरच्या बदल्यात 8000-10000 शिलिंग चलन येथे मिळते. सर्वात मोठी नोट केवळ 500 आहे. त्यामुळे लहान – सहान खर्चासाठी देखील लाखो रुपयांची गरज लागते.जर तुम्हाला एक प्लास्टीकची पिशवी भरुन भाजी घ्यायची असेल तर तुम्हाला एक गोणी भरुन नोटा घेऊन जावे लागते. या देशात रस्त्यावर तुम्हाला नोटांची बड्डले घेऊन बसलेले फेरीवाले बसलेले दिसतील. भाजी मंडई प्रमाणे येथे नोटांची मंडई भरते.या देशातील नोटांच्या बड्डलांच्या विक्रीचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. एखाद्या देशाच्या करन्सीची इतकी दुर्दशा पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.
येथे पाहा व्हिडीओ –
सक्साफी मीडिया आणि बीबीसीच्या बातम्यानुसार याला ‘मनी इन किलोग्राम्स’ असे समर्पक नाव दिले गेले आहे. हा बाजार 1990 मध्ये सोमालीलँडच्या स्वातंत्र्यानंतर बहरला. जेव्हा सिव्हील वॉर नंतर अर्थव्यवस्था रिकव्हर झाली होती. परंतू शिलिंगच्या निच्चांकाने यास अनोखे बनवले आहे. 2000 मध्ये 1 USD = 10,000 SLSH होता. जो 2005 पर्यंत 9,000 आणि 2025 मध्ये सुमारे 8,000 झाला. सक्साफी मीडियाच्या फेब्रुवारी 2024 च्या बातमीनुसार 100 डॉलरच्या एक्स्चेंजच्या बदल्यात इतक्या नोटा मिळतात की त्यांना आणण्यासाठी मोठी झोळी घेऊन जावे लागते. याचे वजन नऊ किलोच्या बटाट्यांच्या वजनाचे असते.फेरीवाले रस्त्यावर फळे – भाजी विकल्याप्रमाणे प्लास्टीक शिट अंथरुन नोटांचा ढीग लावतात आणि या नोटा विकतात.