
सध्याच्या काळात ऑफिस रोमांस हा एक सामान्य ट्रेंड बनला आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक सर्वेक्षणातून समोर आलंय की, ऑफिस रोमांसच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर मेक्सिको आहे, पण भारतही फार मागे नाही. Ashley Madison आणि YouGov च्या अहवालानुसार जवळपास 40 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्याला डेट केलंय किंवा सध्या करत आहेत. हे आकडे सांगतात की आता ऑफिसमधलं प्रेम फक्त अफवा राहिलेलं नाही, तर वास्तव बनलंय.
सर्वेमध्ये हेही दिसलं की पुरुषांनी याबाबतीत जास्त खुलं मन दाखवलं आहे. सहकाऱ्यासोबत नातं स्वीकारण्यात ते पुढे आहेत. तरुण कर्मचारी मात्र थोडे सावध दिसतात, विशेषतः जेव्हा त्यांना भीती वाटते की याचा त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचं मते, भारतातील लोकांची विचारसरणी बदलतेय आणि आता मॉडर्न नातेसंबंधांना पूर्वीपेक्षा जास्त स्वीकारलं जातंय. खरंतर दिवसभर एकत्र असल्यामुळे ऑफिसमध्ये भावनिक जोडणी निर्माण होणं स्वाभाविकच झालंय. जर तुम्ही ऑफिस रोमांसमध्ये असाल तर थोडे समजूतदारपणे पाऊलं उचलणं गरजेचं आहे.
प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधण्याचे ५ मंत्र –
– ऑफिसमध्ये डेटिंग असो किंवा मैत्री, काही गोष्टी फक्त कामापुरत्या मर्यादित राहतील आणि काही वैयक्तिक राहतील हे आधीच ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे अफवा कमी होतील आणि कामावरही लक्ष केंद्रित राहील.
– आपल्या जोडीदाराशी अगदी खुली चर्चा करा की ऑफिसमध्ये कोणत्या गोष्टी शेअर करायच्या आणि कोणत्या पूर्णपणे खासगी ठेवायच्या. यामुळे गैरसमज होणार नाहीत आणि नातंही अधिक मजबूत होईल.
– प्रेम कितीही चांगलं असलं तरी तुमची जबाबदारी आणि डेडलाइन्स तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ऑफिसचं काम कधीही दुय्यम ठरू देऊ नका.
– सहकाऱ्यांसमोर आणि बॉससमोर नेहमी प्रोफेशनल इमेज कायम ठेवा. जास्त ड्रामा किंवा दिखावा तुमची प्रतिमा खराब करू शकतो.
– ऑफिस रोमांसमध्ये लोक अनेकदा सोशल मीडियावर खूप काही शेअर करतात, ज्यामुळे अफवा पसरतात. म्हणून प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा आणि सोशल मीडियाचा वापरही जागरूकतेने करा.
– लक्षात ठेवा, बदलत्या विचारसरणीमुळे ऑफिस रोमांस वाढत असला तरी प्रेम आणि करिअर यांचा समतोल सांभाळणंच खरं बुद्धिमानपणे वागणं आहे. या टिप्स पाळल्या तर ऑफिस रोमांस तुमच्यासाठी तणाव नव्हे तर आनंदाचं कारण बनेल. पुढच्या वेळी जेव्हा ऑफिसमध्ये कोणाशी डेटिंग किंवा नात्याची चर्चा होईल, तेव्हा फक्त या गोष्टी लक्षात ठेवा!
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच दुजोराही देत नाही)