
मध्य प्रदेशातील इंदूरच्या एका आलिशान बंगल्याचा एक व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओपाहून युजरच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. या बंगल्या संदर्भात एक दावा केला जात आहे की घरातील फर्निचरपासून ते वॉश बेसिनपर्यंत सोन्याचा वापर झाला आहे. एवढेच काय इलेक्ट्रीक स्विच देखील २४ कॅरेट सोन्याचे आहेत. हा व्हिडीओ अशा वेळी व्हायरल झाला आहे जेव्हा सोन्याचा दर गगनाला भिडलेला आहे. १ जुलैचा २४ कॅरेटचा सोन्याचा दर देशात १० ग्रामला ९७,५०० रुपयांवर पोहचलेला आहे.
कंटेन्ट क्रिएटर प्रियम सारस्वत यांनी या आलिशान घराचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यास दोन दिवसात २ कोटीहून अधिक व्हयूज होते. आता हा व्हिडीओ या अकाऊंटवरुन डिलिट केलेला आहे. परंतू एक्स साईटवर खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओत या घराचे मालक या घराच्या वस्तू २४ कॅरेट सोन्यापासून तयार केल्याचे दावा करताना दिसत आहेत.
येथे पोस्ट पाहा –
He is a government contractor from Indore.
Initially his 25 members family has a single petrol pump.
Then he moved into the business of government contracts.
He started making roads, bridges and building for govt.
Now even electrical switches in his home are of 24 ct gold. pic.twitter.com/SRJEuqUwa3
— Kapil (@kapsology) June 30, 2025
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ कंटेन्ट क्रिएटर बंगल्यात प्रवेश करण्यासाठी बंगल्याच्या मालकाकडे परवानगी मागताना दिसत आहेत. त्यानंतर घराच्या आवारात उभ्या असलेल्या शानदार कारचे कलेक्शन आपले लक्ष वेधून घेताना दिसते. यात १९३६ च्या विन्टेज मर्सिडिज कारचेही दर्शन होते.
या व्हिडीओत आपण पाहू शकता की १० बेडरुमच्या या आलिशान या बंगल्याचा नजारा पाहून क्रिएटर हैराण होत आहे. त्यानंतर हा क्रिएटर हैराण होऊन म्हणतो की मला खूप काही सोने दिसत आहे. यावर घराचा मालक म्हणतो की हे असली २४ कॅरेट सोन्याचे आहे.
या घराच्या अंतर्गत सजावटीच्या सामानात २४ कॅरेट सोन्याचा वापर झाला आहे. वॉश बेसिनपासून ते वीजेचे सॉकेट देखील सोन्याची आहेत. व्हिडीओ कंटेन्ट क्रिएटर आश्चर्यचकीत होऊन सोन्याचे स्विच दाखवताना दिसत आहे.
या बंगल्याच्या मालक केवळ त्यांच्या लक्झरीसाठी नाही तर त्यांच्या आध्यात्मिक आणि श्रद्धाळू स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे घरात सुंदर बगूचा आणि गोशाळा देखील आहे. इंदूरचा हा बंगला सोशल मीडियावर आर्कषणाचे केंद्र ठरला आहे. या बंगल्याची भव्यता पाहून युजर हैराण होत आहेत. या आलिशान बंगल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.