
स्वस्तात iPhone खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. विजय सेल्सने आपल्या Valentine Sale अंतर्गत iPhone 17 Pro सह अनेक Apple डिव्हाइसेसवर मर्यादित कालावधीसाठी मोठ्या सवलतींची घोषणा केली आहे. या सेलमध्ये थेट डिस्काउंटसोबतच विविध बँक ऑफर्समुळे ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळत आहे.
या Valentine Sale मध्ये iPhone, MacBook, iPad आणि AirPods यांसारख्या Apple उत्पादनांवर इन्स्टंट बँक कॅशबॅक दिला जात आहे. योग्य क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
iPhone 17 Pro वर मोठी बचत
iPhone 17 Pro ला सप्टेंबर लॉन्चदरम्यान 1,34,900 रुपये इतकी किंमत ठेवण्यात आली होती. मात्र सध्या विजय सेल्सवर या फोनवर थेट 2,500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI ट्रान्झॅक्शनवर 4,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे या फोनची इफेक्टिव किंमत सुमारे 1,27,900 रुपये इतकी होते. ज्या ग्राहकांकडे HDFC कार्ड नाही, त्यांच्यासाठी ICICI आणि Axis बँक कार्डवर 4,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे.
iPhone Air आणि iPhone 15 वर आकर्षक ऑफर
Valentine Sale मधील सर्वात मोठा आकर्षणबिंदू म्हणजे iPhone Air 256GB व्हेरिएंट. या फोनची लिस्टेड किंमत 94,990 रुपये असून, त्याची लॉन्च किंमत 1,19,900 रुपये होती. यावर ICICI, Axis आणि HDFC बँक कार्ड वापरल्यास अतिरिक्त 4,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळतो. त्याचप्रमाणे, iPhone 15 सध्या 53,900 रुपयांना उपलब्ध असून, बँक ऑफर लावल्यास त्याची किंमत सुमारे 51,900 रुपये इतकी होते.
MacBook Air M4 देखील स्वस्त
या सेलमध्ये MacBook Air M4 चाही समावेश आहे. याची लॉन्च किंमत 99,900 रुपये होती, मात्र सध्या तो 94,990 रुपयांना विक्रीस उपलब्ध आहे. ICICI आणि Axis बँक कार्ड वापरल्यास 5,000 रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळत असून, यामुळे इफेक्टिव किंमत सुमारे 89,990 रुपये इतकी होते. ही डील विशेषतः विद्यार्थी आणि प्रोफेशनल युजर्ससाठी फायदेशीर मानली जात आहे.
iPad Pro आणि iPad 11th Gen वरही सूट
iPad Pro M5 सध्या 94,900 रुपयांना उपलब्ध असून, त्याची लॉन्च किंमत 99,900 रुपये होती. ICICI आणि HDFC बँक कार्डवर 3,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळाल्याने किंमत आणखी कमी होते. तर 11th जनरेशन iPad ची लिस्टेड किंमत 32,900 रुपये असून, बँक ऑफर लावल्यानंतर त्याची इफेक्टिव किंमत सुमारे 30,900 रुपये इतकी होते, जी Apple च्या अधिकृत वेबसाइटपेक्षा स्वस्त आहे.