मूल जन्माला घातल्यावर सरकार देतंय 2 लाख रुपये!

| Updated on: Dec 15, 2022 | 6:04 PM

ही रक्कम 500,000 येन म्हणजे सुमारे चार लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचारही सरकार करत आहे.

मूल जन्माला घातल्यावर सरकार देतंय 2 लाख रुपये!
नवजात बालिकेला मातेने कचऱ्यात फेकले
Image Credit source: Social Media
Follow us on

जगभरात वाढत्या लोकसंख्येबद्दल चर्चा सुरू असतानाच अनेक देशांमध्ये घटणाऱ्या लोकसंख्येबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे. जपानने आता इथे मुले जन्माला घालण्यासाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ केली आहे. आता जपानमध्ये मुलं होण्याच्या बदल्यात दोन लाख रुपये दिले जाणार आहेत. जपानी सरकारच्या या आदेशाची जगभर चर्चा आहे.

आधी ही रक्कम कमी होती, पण प्रत्यक्षात मीडिया रिपोर्टनुसार, जपानी सरकार मुलांच्या जन्मानंतर लोकांच्या खात्यात सुमारे 420,000 येन म्हणजेच दोन लाख रुपये पाठवत आहे.

माहितीनुसार, आधी ही रक्कम कमी होती मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे. बाळंतपण आणि बालसंगोपनाच्या नावाखाली सरकार ही रक्कम पालकांना त्यांच्या खात्यात पाठवत आहे.

एवढेच नव्हे तर ही रक्कम 500,000 येन म्हणजे सुमारे चार लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचारही सरकार करत आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आरोग्य विभागाने पंतप्रधान फुमियो किशिदा यांचीही भेट घेतली. पुढील वर्षापासून या प्रस्तावाची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे.

जपानमध्ये असं करण्याची दोन कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एक, जपान आपला कमी आणि घटता जन्मदर वाढविण्याचा प्रयत्न बऱ्याच काळापासून करीत आहे आणि त्याअंतर्गत हे पाऊल उचलले गेले आहे.

दुसरं कारण म्हणजे जपानमध्ये मुलाच्या प्रसूतीसाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. सरकारच्या या मदतीमुळे डिलिव्हरीनंतर पैशांचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.