AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जॉब पोस्ट वायरल! कोळी पकडण्यासाठी 4 हजार, पुढे काय झालं ते तर वाचाच!

हे लोक कोळीला पकडण्यासाठी आले होते, मात्र, यातील बहुतांश लोक आधीच घाबरलेल्या महिलेची खिल्ली उडवून तमाशा पाहण्याच्या हेतूने आले होते.

जॉब पोस्ट वायरल! कोळी पकडण्यासाठी 4 हजार, पुढे काय झालं ते तर वाचाच!
Caught the spider
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 10, 2023 | 6:02 PM
Share

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका घाबरलेल्या ब्रिटीश महिलेने आपल्या घरात असलेल्या एका मोठ्या आणि विषारी कोळ्याला बाहेर काढण्यासाठी 50 डॉलरची ऑफर दिली, तेव्हा तिच्या घराबाहेर गर्दी जमली. हे लोक सिडनीच्या कुग्गी भागात सापडलेल्या शिकारी कोळीला पकडण्यासाठी आले होते, जे विषारी असल्यामुळे मानवासाठी प्राणघातक ठरू शकते. मात्र, यातील बहुतांश लोक आधीच घाबरलेल्या महिलेची खिल्ली उडवून तमाशा पाहण्याच्या हेतूने आले होते.

जॉब पोस्ट वायरल

‘डेली मेल’ या न्यूज वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या महिलेने ही नोकरी ऑफर केली, तिने आपल्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं आहे की, मला माझ्या घरातून कोळ्याला हाकलून द्यावं लागेल आणि जो कोणी हे काम करेल त्याला त्या बदल्यात पैसे दिले जातील. लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांनंतर लोकांनी या कामासाठी पैसे मागितले असता त्यांनी सांगितले की, त्यांच्या खोलीत असलेला कोळी खूप मोठा आहे, त्यामुळे हे काम करणाऱ्या व्यक्तीला मी 50 डॉलर म्हणजेच 4 हजार रुपये रोख देईन.

आपल्या पोस्टला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे आपली अडचण लवकरच दूर होईल, अशी आशा या महिलेला होती. परंतु बक्षीस किंवा मदतीच्या नावाखाली तासन् तास उलटूनही कोणीही घरात न आल्याने त्याने पोलिसांना फोन केला. मात्र, स्थानिक पोलिसांनी या महिलेला तत्काळ मदत केली नाही.

या कथेच्या शेवटी काय घडलं?

या महिलेने याबद्दल पुन्हा काहीही पोस्ट केले नाही, परंतु तिच्या नोकरीच्या ऑफरने सोशल मीडियावर बरीच चर्चा केली. कोणी या पोस्टवर मजेशीर कमेंट करत आहे, तर कोणी शेअर करताना दिसत आहे. एका युजरने लिहिलं आहे की, “जर अशा खतरनाक कोळीला पकडण्यासाठी पाचशे डॉलर्स दिले असते तर मी तुमचं काम करू शकलो असतो पण यावेळी माफ करा .”

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन