Video : एवढ्या लहान वयात इतकं डोकं चालतं तरी कसं? कपड्याची घडी घालण्यासाठी काय Jugaad केला? पाहा…

Kid jugaad : आता लहान मुलेही जुगाडू झाली आहेत. असाच एक जुगाड व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ एका लहान मुलाचा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एक लहान मूल कपड्यांची घडी घालण्यासाठी जुगाड करत आहे.

Video : एवढ्या लहान वयात इतकं डोकं चालतं तरी कसं? कपड्याची घडी घालण्यासाठी काय Jugaad केला? पाहा...
कपड्याची घडी घालण्यासाठी चिमुकल्याचं जुगाड
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 13, 2022 | 1:30 PM

Kid jugaad : तुम्ही सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. जुगाडचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही जुगाड बनवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. काही लोकांचे जुगाड एवढे जबरदस्त असते, की ते पाहून मोठे इंजिनीअरही थक्क होतात. मोठी माणसेच नाही तर आता त्यांना स्पर्धक म्हणून लहान मुलेही आली आहेत, असे वाटते. कारण आता लहान मुलेही जुगाडू झाली आहेत. असाच एक जुगाड व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ एका लहान मुलाचा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एक लहान मूल कपड्यांची घडी घालण्यासाठी जुगाड करत आहे. मुलाचे वय इतके लहान आहे, की त्याचा जुगाड बघून तुमच्या तोंडून बाहेर पडेल, की एवढ्या लहान वयात इतके डोके चालते तरी कसे?

काही सेकंदात घडी

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मुलाने एक कार्डबोर्ड अशा प्रकारे कापला आहे, की तो कपडे व्यवस्थित फोल्ड करू शकेल. यानंतर, त्या पुठ्ठ्याचा वापर करून, तो आपले कपडे वेगाने दुमडतो. या जुगाडाच्या साह्याने कपड्याची व्यवस्थित घडी बसेल अशापद्धतीने कपडे दुमडले जात आहेत. मूल काही सेकंदात वेगाने अनेक कपडे फोल्ड करताना दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hackscreatived नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे, की त्याला आतापर्यंत 1 मिलियनपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून लोक त्या मुलाचे प्रचंड कौतुक करत आहेत. सोशल मीडिया यूझर्स मुलाला सुपर क्रिएटिव्हचा टॅग देत आहेत. मुलाचा जुगाड पाहून एका यूझरने कमेंटमध्ये लिहिले, ‘खूप छान आयडिया’

आणखी वाचा :

Viral video : बदकाशी पंगा कुत्र्याला पडला महाग, पाहा बदकानं काय केलं की कुत्रा गेला पळून!

सैरभैर झालेल्या अस्वलानं केला हल्ला, Circusमधला ‘हा’ धक्कादायक Viral video पाहा

Funny video viral : कामाच्या वेळेला मौजमजा करायची नसते, हेच विसरला ‘हा’ Delivery boy आणि…