Funny video viral : कामाच्या वेळेला मौजमजा करायची नसते, हेच विसरला ‘हा’ Delivery boy आणि…

Delivery boy funny video : कामाच्या मधल्या वेळेत मौजमजा करू नये याचीही विशेष काळजी घ्यावी, नाहीतर जड जाईल. असाच एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक डिलिव्हरी बॉय कामाच्या मध्येच मस्ती करायला लागतो.

Funny video viral : कामाच्या वेळेला मौजमजा करायची नसते, हेच विसरला 'हा' Delivery boy आणि...
कामाच्या दरम्यान मौजमजा करणं डिलिव्हरी बॉयला पडलं महाग
Image Credit source: Twitter
प्रदीप गरड

|

Mar 13, 2022 | 11:44 AM

Delivery boy funny video : असे म्हणतात, की कामाच्या दरम्यान काही मिनिटे मजा करणेदेखील आवश्यक आहे. जर तुम्ही बसून फक्त काम करत असाल आणि 2-4 मिनिटे ब्रेकही (Break) घेत नसाल तर भविष्यात तुमच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. याशिवाय सततच्या कामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. म्हणूनच कामाच्या मध्यभागी थोडा वेळ काढणे आणि मित्रांसोबत हसणे आणि विनोद करणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या दरम्यान थोडा वेळ काढून इतर कर्मचाऱ्यांसोबत मौजमजा करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, पण कामाच्या मधल्या वेळेत मौजमजा करू नये याचीही विशेष काळजी घ्यावी, नाहीतर जड जाईल. असाच एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक डिलिव्हरी बॉय कामाच्या मध्येच मस्ती करायला लागतो आणि जे काही घडते ते पाहून कुणालाही हसायला येईल.

…आणि सरळ पार्सलमध्ये पडतो

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक डिलिव्हरी बॉय पार्सल पोहोचवण्यासाठी येतो आणि घरासमोरील पार्कमध्ये खेळायला लागतो. प्रथम तो एक चेंडू त्याच्या पायाने मारून दूर फेकतो आणि नंतर समोर पडलेल्या ट्रॅम्पोलिनवर उड्या मारू लागतो. तो ट्रॅम्पोलिनवर फक्त 2-3 वेळा उडी मारतो, की अचानक त्याचा पाय बाजूला पडतो आणि तो ट्रॅम्पोलिनसह उलटतो. यादरम्यान, तो सरळ जाऊन पार्सलवरच पडतो, त्यामुळे पार्सलमध्ये ठेवलेला माल बाहेर विखुरला जातो आणि कार्टूनही पूर्णपणे फाटते. हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल.

ट्विटर हँडलवर शेअर

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक मजेशीर गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘ज्येष्ठांनी शिकवले आहे, की काम करताना मजा करू नका. डिलिव्हरी बॉयने त्यांच्या सल्ल्याचे पालन न केल्याने त्याची अवस्था अशी झाली. अवघ्या 10 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

हसणारे इमोजी केले शेअर

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने डिलिव्हरी बॉयच्या या कृत्याला निष्काळजीपणा असे वर्णन केले आहे, तर इतर अनेक यूझर्सनी कमेंट बॉक्समध्ये हसणारे इमोजी शेअर केले आहेत आणि हा व्हिडिओ खरोखर किती मजेदार आहे हे सांगितले आहे.

आणखी वाचा :

कर्नाटकातल्या मच्छिमारांना सापडला दुर्लभ मासा, वजन तब्बल 250 किलो! पाहा Video

Viral : अखेर कोणत्या भारतीयानं काढले रशियाविरुद्ध हत्यार? सोशल मीडियावरचा ‘हा’ Video पाहा…

Balloon craft : अशी Creativity वापरून तुम्हीही बनवू शकता टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, Video viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें