Desi jugaad : आपल्या देशात लोक आपले काम व्यवस्थित करण्यासाठी कधीतरी काहीतरी जुगाड करतात. कारण जुगाड हा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे आपले काम सोपे होईल आणि अशक्य कामदेखील शक्य होईल. म्हणूनच जेव्हा जेव्हा कोणाला एखादे काम अवघड किंवा अशक्य वाटते तेव्हा तो आपले काम करण्यासाठी जुगाड वापरतात. आता नुकताच व्हायरल (Viral) होत असलेला हा व्हिडिओ (Video) पाहा, एका व्यक्तीने जुगाडच्या माध्यमातून ट्रेनची (Train) सीट कशी मिळवली. आपल्यापैकी बहुतेकांना सुट्टीच्या वेळी शेवटच्या क्षणी रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे किंवा तातडीच्या कामामुळे प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतो. विशेषत: सण-उत्सवाच्या काळात ट्रेन खचाखच भरलेली असते. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला जेव्हा तो ट्रेनमध्ये पोहोचला, त्याला जागा मिळाली नाही, पण त्याने असा जुगाड केला की, जे पाहून सुरुवातीला तुम्हीही म्हणाल, हा माणूस खरोखरच कल्पक निघाला! पण क्लिपच्या शेवटी असे काही घडते की ती व्यक्ती हसण्याचा विषय बनते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस दोन बाजूंच्या बर्थमध्ये चादर बांधतो आणि झोपण्यासाठी त्यात चढतो. तो वर चढून बसण्याचा प्रयत्न करताच, सीटवरून बांधलेली चादर निसटते आणि ती व्यक्ती दणक्याने खाली पडते. त्यावेळी त्याचे हावभाव पाहण्यासारखे होतात. हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर memes.bks नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘इतका जुगाड ठीक नाही भाऊ’ असे लिहिले आहे. तसेच कैलाश खेर यांचे ‘करले जुगाड’ हे गाणेही व्हिडिओसोबत जोडण्यात आले आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओला आतापर्यंत 1577 लोकांनी लाइक केले आहे. यासोबतच अनेक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. एका यूझरने लिहिले, की भाई तो जुगाड़ Extreme तक ले जाना चाहता था लेकिन किस्मत ने साथ नहीं दिया. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘पुढच्या वेळी असा जुगाड करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल.’