
Viral Video: भारतात फिरण्यासाठी आलेली एक दक्षिण कोरियन यूट्यूबर महिला रस्त्याच्या कडेला व्लॉग करत असताना तिच्यासोबत असं काही घडलं, ज्याची तिने कल्पनाही केली नसेल. महिलेच्या बाजूला एक पुरुष उभा होता. पुरुषाला पाहिल्यानंतर महिलेला थोडं विचित्र वाटलं. तिने म्हणाली, ‘माझ्याकडे का असं एकटक पाहत आहेस…?’ महिलेने केलेल्या आरोपांनंतर पुरुषाने दिलेल्या उत्तरावर महिला अवाक् झाली. अशात तुम्ही देखील विचारात पडला असाल की पुरुषाने नक्की काय उत्तर दिलं असेल. अखेर महिलेने भारतीय पुरुषाची माफी देखील मागितली.
अशात भारतील पुरुष आणि कोरियन महिला यांच्यामध्ये नक्की काय बोलणं झालं असेल… असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, कोरियन यूट्यूबर ‘पोटाटो टर्टल’ व्लॉगिंग करत असताना तिने एका स्थानिक दुकानदाराला तिच्या जवळ उभे असलेले पाहिले.
त्यानंतर महिलेने कोरियनमध्ये विचारलं – ‘तू माझ्याकडे का पाहत आहेस?’ मग तिने भारतीय पुरुषाची खिल्ली उडवत ‘मी तुला आवडली आहे का?’
असा प्रश्न विचारला. परदेशी पहिला सर्वकाही आत्मविश्वासाने रेकॉर्ड करत होती. मात्र या घटनेने रंजक वळण घेतलं जेव्हा दुकानदारानेही महिलेला कोरियन भाषेत उत्तर दिलं. तो म्हणाला, मी जवळच्याच दुकानात काम करतो. हे ऐकून YouTuber आश्चर्यचकित झाली.
भारतीय पुरुषाने महिलेला सांगितलं की, मी याआधी कोरिया येथील एका स्टोरमध्ये काम केलं आहे. तेथेच कोरियन भाषा शिकली आहे. त्यानंतर दोघे कोरियन भाषेत संवाद साधू लागले. त्यानंतर आपण पुरुषावर चुकीचे आरोप लावले… याची जाणीव झाल्यानंतर कोरियन महिलीने माफी देखील मागितली.
काही सेकंदांची ही व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर briefchaat नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत जवळपास 13 लाखपेक्षा जास्त लोकांनी या पोस्टला लाईक केलं आहे, तर कमेंट बॉक्स मजेदार कमेंट्सने भरला आहे.