मुलांच्या हॉस्टेल मधील फोटो व्हायरल! सगळ्यांनाच प्रश्न पडला “पंखे असे का आहेत?”

देशातील स्पर्धा परीक्षांचे कोचिंग सेंटर म्हणून कोटाची ओळख आहे. कोचिंगसाठी देशभरातून विद्यार्थी कोटा मध्ये येतात.

मुलांच्या हॉस्टेल मधील फोटो व्हायरल! सगळ्यांनाच प्रश्न पडला पंखे असे का आहेत?
Kota hostel photo
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 09, 2022 | 5:04 PM

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ट्विटर युजरचा दावा आहे की, हा फोटो कोटा मधील एका विद्यार्थी वसतिगृहातील आहे. ही जाळी पंख्याखाली का बसवली गेली आहे, असा सवाल त्यानी विचारला आहे. यावर सर्व युझर्सनी आपला अभिप्राय दिलाय. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे त्यांनी यात सांगितलंय.

देशातील स्पर्धा परीक्षांचे कोचिंग सेंटर म्हणून कोटाची ओळख आहे. कोचिंगसाठी देशभरातून विद्यार्थी कोटा मध्ये येतात.

इथे आत्महत्येच्या घटनाही झपाट्याने वाढल्या आहेत. परीक्षेत यश न मिळाल्याने अनेकदा येथील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत असतात. सर्वाधिक आत्महत्या सिलिंग फॅनला लटकून होतात. हेच टाळण्यासाठी एका हॉस्टेलने पंख्याखाली जाळी लावलीये.

3 ऑक्टोबर रोजी ट्विटर हँडल @GabbbarSingh यांनी हा फोटो शेअर केलाय. त्याने कॅप्शनमध्ये विचारले कोटामधील एका स्टुडंट हॉस्टेलमध्ये असं का आहे?

या ट्विटला 8 हजारांहून अधिक लाईक्स आणि सहाशेहून अधिक रिट्विट मिळाले आहेत. तसेच, शेकडो युझर्सनी या माणसाच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

विद्यार्थी आत्महत्येपासून बचाव करण्यासाठी हे करण्यात आल्याचं बहुतांश युजर्सनी सांगितलं तर काही युझर्सनी वेगळंच ज्ञान द्यायला सुरुवात केलीये.