AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनालीमध्ये रहस्यमय बकरी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, जवळ जाताच अचानक होते गायब? नेमकं रहस्य काय?

कुल्लूमधील जोगनी माता मंदिर येथील एका बकरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या बकरीजवळ जाताच ती अचानक गायब होते असा दावा देखील करण्यात येत आहे. नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या सविस्तर

मनालीमध्ये रहस्यमय बकरी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, जवळ जाताच अचानक  होते गायब? नेमकं रहस्य काय?
| Updated on: Aug 10, 2026 | 3:23 PM
Share

जर कोणी तुम्हाला सांगितले की, मंदिराच्या परिसरात एक बकरी दररोज दिसते; मात्र तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला की ती अचानक डोळ्यांसमोरून गायब होते तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का? हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील झीरी येथील जोगनी माता मंदिरातील एका बकरीची कथित रहस्यमय घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणून ओळखले जाते. येथील मंदिरं, धार्मिक परंपरा आणि स्थानिक श्रद्धांना मोठे महत्त्व आहे. अशातच कुल्लू जिल्ह्यातील झीरी येथील जोगनी माता मंदिर परिसरात गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून एक बकरी सातत्याने दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिक आणि मुलांच्या म्हणण्यानुसार ही बकरी जवळपास तीन महिन्यांपासून मंदिर परिसरातील ठराविक ठिकाणी दिसत आहे. सामान्यतः पाळीव किंवा भटक्या जनावरांची हालचाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असते. मात्र, या बकरीची ठराविक पद्धतीने होणारी ये-जा अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे.

रात्री 7 वाजता येते, पहाटे 5 वाजता जाते

स्थानिकांच्या दाव्यानुसार, ही बकरी अनेकदा संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात येते. त्यानंतर पहाटे 5 वाजताच्या आसपास पुन्हा एका ठराविक ठिकाणी जाऊन बसते असा दावा करण्यात आला आहे.

दिवसभरही ही बकरी मंदिराच्या आसपास फिरताना आणि परिसराला चक्कर मारताना दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही भाविक या घटनेकडे केवळ योगायोग म्हणून पाहत नाहीत तर तिचा संबंध जोगनी मातेशी जोडून पाहत आहेत.

बकरी काही खात नाही?

या बकरीच्या आहाराबाबतही वेगवेगळे दावे समोर येत आहेत. काही स्थानिकांच्या मते, ही बकरी रात्रीच्या वेळी गवत किंवा चारा खाते. तर काही प्रत्यक्षदर्शी असे सांगतात की, त्यांनी या बकरीला कधी काही खाताना किंवा पाणी पिताना पाहिलेलेच नाही. यामुळे बकरीच्या वर्तनाबाबत आणखी प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

जवळ जाताच बकरी गायब होते?

या संपूर्ण प्रकरणाला रहस्यमय वळण देणारा दावा म्हणजे बकरी अचानक गायब होत असल्याचा. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी दूरून बकरीला पाहिले. मात्र, तिच्याजवळ जाण्याचा किंवा तिला तिथून आणण्याचा प्रयत्न केला असता ती क्षणार्धात नजरेआड झाल्याचे काहींचे म्हणणे आहे.

या दाव्यामुळे सोशल मीडियावर या बकरीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काहीजण याला मंदिराशी संबंधित एखादी अलौकिक घटना मानत आहेत, तर काहीजण याकडे केवळ प्राण्याच्या नैसर्गिक वर्तनाच्या दृष्टीने पाहत आहेत.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना