AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉलच्या चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत होती महिला, लहान मुलाने हळूच केलं LIVE

चेंजिंग रुममध्ये एक महिला कपडे बदलत असताना हा सर्व प्रकार घडला.

मॉलच्या चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत होती महिला, लहान मुलाने हळूच केलं LIVE
Mall Changing RoomImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 11, 2023 | 2:17 PM
Share

चीनमधून एक अतिशय आश्चर्यकारक आणि संतापजनक प्रकरण समोर आलं आहे. एका शॉपिंग मॉलमध्ये एक महिला चेंजिंग रूममध्ये असताना हा सर्व प्रकार घडला. त्याचवेळी एका दोन वर्षांच्या मुलाने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईव्ह केला, असा आरोप या महिलेने केला आहे. या घटनेनंतर महिलेने मुलाला आणि त्याच्या आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने मॉलमध्ये गोंधळ उडाला.

वास्तविक, ही घटना चीनमधील एका शहरातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, इथल्या युनिक्लो स्टोअरच्या चेंजिंग रुममध्ये एक महिला कपडे बदलत असताना हा सर्व प्रकार घडला.

तिथे एक दोन वर्षांचा मुलगा उभा होता. हा मुलगा त्या महिलेचा नव्हता. हा प्रकार करणाऱ्या महिलेला पाहताच त्याने आपल्या मोबाइलचा कॅमेरा महिलेकडे वळवला.

रिपोर्टनुसार, सुरुवातीला महिलेला समजू शकले नाही, पण जेव्हा तिने मागे वळून पाहिले तेव्हा ती स्तब्ध झाली. तिने मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मुलाची आईही थोड्या अंतरावर होती. या मुलाने चेंजिंग रूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईव्ह केल्याचा आरोप या महिलेने केला.

या घटनेनंतर महिलेने त्याचा फोनही हिसकावून घेतला. मुलगा आणि त्याची आई दोघेही आपली हेरगिरी करत असल्याचा आरोपही या महिलेने केला. सध्या ही घटना कशीबशी शांत झालीये.पण सोशल मीडियावर पुन्हा लैंगिक छळ, महिलांच्या हक्कांची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर लैंगिक शिक्षण आणि लहान मुलांसाठीच्या नियमांचीही विस्तृत चर्चा व्हायला हवी, अशीही चर्चा आहे.

Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...