AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची विलीनीकरणावर खुली ऑफर; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आम्ही आता…

शरद पवारांनी बंडखोरांना खुली ऑफर दिली आहे. ज्यांना यायचं असेल, ते येऊ शकतात, अशी ऑफर शरद पवारांनी दिली आहे.

शरद पवारांची विलीनीकरणावर खुली ऑफर; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आम्ही आता...
sharad pawar and sunetra pawarImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 3:05 PM
Share

राष्ट्रवादीत उभी फूट पडून दोन गट निर्माण झालेत. एक गट विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. तर दुसरा सत्तेत आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, असा दावा काही नेत्यांकडून करण्यात येत होता. तर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते अंतर्गत वादावरही उघडपणे भाष्य करत होते. मंत्री नरहरी झिरवळ यांनी तर दोन्ही पक्ष एकत्र यावेत, अशी इच्छा बोलून दाखवली होती. परंतु आता पुन्हा दोन्ही पक्ष वेगवेगळ्या मार्गाने जाताना दिसत आहेत. यादरम्यान शरद पवारांनी बंडखोरांना पक्षाची दारे खुली केली आहेत. ‘आम्ही कुणासोबत जाणार नाही, कुणाला यायचं असेल, तर आमच्यात या, असं विधान शरद पवारांनी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता सुनेत्रा पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल पाटील यांनी विलीनीकरणाची चर्चा फेटाळली 

मंत्री अनिल पाटील म्हणाले, ‘शरद पवारांनी काय विधान केलं, याच्यापेक्षा महत्त्वाचं विषय असा आहे की, विलीनीकरणाची चर्चा ही कुठल्याही स्तराविषयी मी तरी कुठे ऐकलं नाही. विलीनीकरणाच्या विषयाला फुलस्टॉप दिला पाहिजे. शरद पवार दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत. ते राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी सांगितलं असेल, आमच्या पक्षात या. ज्यांना जायचं असेल, ते जाऊ शकतात. आमच्या पक्षाचं काम स्वतंत्ररित्या पक्षाच्या नेत्याकडून सुरू आहे. आम्ही विलीनीकरणासाठी जाणार नाही. आमच्यापर्यंत आणि पक्षश्रेष्ठीपर्यंत चर्चा झालेली नाही’.

एनडीएमध्ये सामील होण्याचं उत्तर शरद पवार देतील – अनिल पाटील 

शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चेविषयी अनिल पाटील म्हणाले, ‘एनडीएमध्ये सामील होण्याबाबत त्यांची एनडीएच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली किंवा नाही, याचं उत्तर तेच देतील. आमच्यासोबत, आमच्यासमोर एनडीएमध्ये जाण्याविषयी कोणती चर्चा झाली नाही. याचं उत्तर देखील शरद पवार देतील’. दोन्ही पक्ष एकत्र येतील,असे बोलले जात होते, त्यावर पाटील म्हणाले, ‘कोणी काय म्हणण्यापेक्षा, मी स्पष्टपणे सांगतो की, आमच्या पक्षासोबत कोणतीही चर्चा झाली नाही’.

Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...