‘पायलट नहीं तो फ्लाइट में क्यों चढ़ाया…’महिला IAS ने विमान कंपनीलाच वटणीवर आणलं…

आयएएस सोनलने तिच्या ट्विटसोबत एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रवासी फ्लाइटच्या आत बसून टेक ऑफची वाट पाहत आहेत. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना GoFirst Airline ने विलंबाबद्दल माफी मागितली होती.

पायलट नहीं तो फ्लाइट में क्यों चढ़ाया...महिला IAS ने विमान कंपनीलाच वटणीवर आणलं...
| Updated on: Apr 09, 2023 | 4:50 PM

नवी दिल्ली : सध्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याचे ट्विट प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला की, कॅप्टन नसल्यामुळे विमानाला सुमारे 2 तास उशीर झाला होता. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांसह सर्व प्रवासी फ्लाइटमध्येच अडकले होते. त्यानंतर या प्रकारामुळे विमान कंपनीकडूनही दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. आयएएस सोनल गोयल यांनी एकामागून एक ट्विट करत गो फर्स्ट एअरलाइनला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांमध्ये त्यांनी लिहिले आहे की, फ्लाइट ऑपरेशन्सबाबत कंपनीकडून अनपेक्षित आणि वाईट अवस्था आहे.

मुंबई विमानतळावरून दिल्लीसाठी फ्लाइट G8 345 हे रात्री 10:30 वाजता उड्डाण करणार होते. मात्र तासापेक्षा जास्त अधिक विलंब झाला होता. त्यामुळे काही प्रवासी विमानात अडकून पडले होते.

विलंबाचे कारण काय असं विचारल्यावर कॅप्टन उपलब्ध नसल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आणि दुसऱ्या कॅप्टनची व्यवस्था करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

तर त्याच प्रकरणावरून दुसर्‍या ट्विटमध्ये, महिला आयएएस अधिकाऱ्याने विचारले की, जर कॅप्टन तिथे नसेल तर फ्लाइटमध्ये प्रवासी का बसवले तुम्ही.ज्यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवासी आहेत. आणि विमानामध्ये पाण्याशिवाय दुसरं काहीही ते देत ​​नाहीत.

तसेच फ्लाइटच्या विलंबाची माहितीही कोणत्याही प्रवाशाला देण्यात आली नाही. तर एक कॅप्टन दुसर्‍या फ्लाईटसाठी रवाना झाल्याचेही सांगण्यात आले.

आयएएस सोनलने तिच्या ट्विटसोबत एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रवासी फ्लाइटच्या आत बसून टेक ऑफची वाट पाहत आहेत. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना GoFirst Airline ने विलंबाबद्दल माफी मागितली होती.

तर कंपनीने लिहिले की, तुम्हाला झालेल्या उशीराबद्दल क्षमस्व. विमानसेवा वेळेवर चालवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत, मात्र कधीकधी अनपेक्षित घटना घडत असतात. भविष्यात, आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असा अश्वासनही त्यांनी दिलं आहे.

सोनल गोयल या 2008 च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्या पानिपत (हरियाणा) येथील रहिवासी आहे. मात्र, त्यांनी त्यांचा अभ्यास दिल्लीतून केला आहे. त्यांचा नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय रँक 13 होता. सध्या ते त्रिपुरा भवनमध्ये विशेष निवासी आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये NITI आयोग, युनायटेड नेशन्स आणि MyGov द्वारे निवडलेल्या ‘टॉप 25 वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’च्या यादीतही त्यांचे नाव नोंदविले गेले होते.

सोनल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ट्विटरवर त्यांचे ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी इन्स्टाग्रामवर 7 लाखांहून अधिक लोक त्यांना फॉलो करतात. फेसबुकवरही त्यांची चांगली फॅन फॉलोइंग असून तिथे त्यांचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.