दारुच्या बाटल्यांनी भरलेलं दुकान, थेट बिबट्या शिरला अन्… घडलं असं काही की सगळेच थक्क!

Leopard Attack On Liquor Shop: दारूच्या दुकानात अचानक बिबट्या शिरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हे भयानक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

दारुच्या बाटल्यांनी भरलेलं दुकान, थेट बिबट्या शिरला अन्... घडलं असं काही की सगळेच थक्क!
Leopard
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 26, 2026 | 7:02 PM

आजकाल जगभरात ज्या वेगाने झाडे तोडली जात आहेत, त्याच वेगाने वन्य प्राण्यांनीही जंगलातून बाहेर पडून खुलेआम फिरणे सुरू केले आहे. पण या वन्य प्राण्यांचे असे खुलेआम बाहेर फिरणे सामान्य लोकांसाठी खूप धोकादायक ठरू शकते. कारण हे प्राणी कधीही सामान्य लोकांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना नुकसान पोहोचवू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

हा व्हिडिओ राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील टोडरायसिंह येथील दारूच्या दुकानाचा असल्याचे सांगितले जात आहे. तिथे दुकानात सेल्समॅन ग्राहकांना दारू देत असतो. इतक्यात अचानकच एक बिबट्या मोठ्या वेगाने येतो आणि अचानक उडी मारून दुकानात घुसतो. हा व्हिडीओ सोशल मीडिया एक्सवर २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जो दुकानाचा सेल्समॅन आहे, तो ग्राहकांना दारू देताना दिसत आहे. पण जेव्हा त्याच्याजवळच्या दारूच्या बाटल्या संपतात आणि तो बाटल्या घेण्यासाठी दुकानाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जातो, तेव्हा अचानक एक बिबट्या येतो आणि उंच उडी मारून दुकानात घुसतो. बिबट्या सेल्समॅनवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण सेल्समॅन मोठ्या चातुर्याने बिबट्याच्या हल्ल्यातून बचाव करून दुकानातून बाहेर पडतो. त्यानंतर बिबट्या दुकानात तोडफोड करतो, काही दारूच्या बाटल्या पाडतो. हा सारा देखावा दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतो. ज्यात दुकानाचा बहुतांश भाग स्पष्ट दिसत आहे. मात्र, त्यानंतर बिबट्या कुठे गेला, याची पुष्टी व्हिडिओमध्ये झालेली नाही. हा व्हिडीओ ‘घर के कलेश’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

लोकांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स करायला सुरुवात केली. एका युजरने मोठ्या मजेदार अंदाजात लिहिले की आज सिद्ध झाले की चित्ताही दारू पितो. तर दुसऱ्या युजरने लिहिले की बिबट्या फक्त रेड वाइन आणि व्हिस्की खरेदी करायला आला होता. आणखी एका युजरने मोठ्या मजेशीरपणे म्हटले की, माझ्यासाठी रमची बाटली आणा. एकूणच लोकांनी याला विनोद म्हणून घेतले आहे. पण आजच्या काळात वन्य प्राण्यांचे असे खुलेआम फिरणे सामान्य लोकांसाठी एक मोठी समस्या बनत चालले आहे. अनेकदा सोशल मीडियावर अशा घटना दिसतात, जिथे असेच वन्य प्राणी अचानक लोकांवर हल्ला करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us