हिरा चाटल्याने माणसाचा मृत्यू होतो का? काय आहे सत्य?

या रत्नाशी अनेक आख्यायिकाही निगडित आहेत. काही लोक म्हणतात की हिरे चाटल्याने कोणत्याही व्यक्तीचा एका क्षणात मृत्यू होऊ शकतो. हा दावा खरा आहे का?

हिरा चाटल्याने माणसाचा मृत्यू होतो का? काय आहे सत्य?
Diamond
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 31, 2023 | 12:35 PM

हिरा हा या जगात आढळणारा पारदर्शक दगड आहे, ज्याच्या सुंदरतेमुळे हे जगातील सगळ्यात जास्त मागणी असणारं रत्न आहे. हिरा पृथ्वीवर आढळणारा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे, म्हणजे तो सहजासहजी तोडता येत नाही. शास्त्रज्ञांच्या मते, हिरा खरे तर कार्बनच्या शुद्ध रूपापासून बनविलेले खनिज आहे. याला कार्बनचे घन म्हणजेच सॉलिड फॉर्म म्हणता येईल. त्याच्या कडकपणामुळे आणि सौंदर्यामुळे याला जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हटले जाते.

हिरे जगातील मोजक्याच देशांमध्ये आढळतात. या रत्नाशी अनेक आख्यायिकाही निगडित आहेत. काही लोक म्हणतात की हिरे चाटल्याने कोणत्याही व्यक्तीचा एका क्षणात मृत्यू होऊ शकतो. हा दावा खरा आहे का? आज आम्ही हे सत्य उलगडणार आहोत, जेणेकरून तुम्हालाही एक नवीन माहिती मिळेल.

शास्त्रज्ञांच्या मते हिरा चाटल्यामुळे झालेल्या मृत्यूत तथ्य नाही. हिऱ्यांमध्ये असे कोणतेही विषारी पदार्थ नसतात ज्यामुळे मनुष्याचा मृत्यू होतो. त्यामुळे जर एखादी व्यक्ती असा दावा करत असेल तर तो फक्त इतरांची दिशाभूल करतोय आणि त्यात काहीही तथ्य नाही.

हिरा गिळल्याने माणसाचा मृत्यू होतो असे अनेकांचे म्हणणे आहे. तर हे अगदी खरे आहे. हिरेच नव्हे तर कोणतीही ठोस वस्तू गिळताना श्वसन नलिकेत अडकण्याची भीती असते, ज्यामुळे श्वास न घेतल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आणखी एक वस्तुस्थिती अशी आहे की हिरे हे अतिशय कडक धातू आहेत, ते हातोड्यासारख्या शक्तिशाली वस्तूने चिरडले तर जाऊ शकतात पण तोडले जाऊ शकत नाहीत.