Video : आता काही खरं नाही!, सिंह आणि म्हशीमधलं युद्ध थांबता थांबेना!, पाहा व्हीडिओ…

एक व्हीडिओ आताही समोर आला आहे. यात उन्हामुळे सुकलेलं गवत पाहायला मिळतंय. त्यात एक म्हैस उभी आहे. तिच्याभोवती चार सिंह आहेत. त्यातला एक-एक करून या म्हशीवर हल्ला चढवतात.

Video : आता काही खरं नाही!, सिंह आणि म्हशीमधलं युद्ध थांबता थांबेना!, पाहा व्हीडिओ...
viral video
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 1:55 PM

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून म्हैस आणि सिंह यांचं युद्ध सुरू आहे. त्याचे विविध व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. असाच एक व्हीडिओ (viral video) आताही समोर आला आहे. यात उन्हामुळे सुकलेलं गवत पाहायला मिळतंय. त्यात एक म्हैस उभी आहे. तिच्याभोवती चार सिंह (lion and Buffalo video) आहेत. त्यातला एक-एक करून या म्हशीवर हल्ला चढवतात. ही म्हैस गोल-गोल फिरते. पण हे सिंह तिचा पिच्छा सोडत नाहीत. ते तिच्या पाठीवर चढल्याचं पाहायला मिळतं.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ आताही समोर आला आहे. यात उन्हामुळे सुकलेलं गवत पाहायला मिळतंय. त्यात एक म्हैस उभी आहे. तिच्याभोवती चार सिंह आहेत. त्यातला एक-एक करून या म्हशीवर हल्ला चढवतात. ही म्हैस गोल-गोल फिरते. पण हे सिंह तिचा पिच्छा सोडत नाहीत. ते तिच्या पाठीवर चढल्याचं पाहायला मिळतं.

हा व्हीडिओ Wildlife Stories या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला अनेकांनी लाईक केलंय. तसंच काहींनी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकजण म्हणतो, ती म्हैस खरी वाघीण आहे. एवढ्या सिंहाशी एकटी लढतीये. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

असाच आणखी एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये सिंह पुढे पळताना दिसत आहेत. त्यांच्या मागे एक म्हैस दिसत आहे. मग काही क्षणात यातील एक सिंह माघारी वळतो आणि म्हशीच्या अंगावर धावून जातो. मग ही म्हेस दोन पावलं मागे जात. पण मग तिच्या मागे म्हशींचा घोळका असतो. ती त्याच्यात सामील होतो हे पाहून सिंह घाबरतो. आणि तो आपल्या मार्गाने निघून जातो. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.