VIDEO : दैव बलवत्तर म्हणून… रस्त्यावर सायकल चालवत होती, कारखाली आली; पण…

हा थरारक व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या 9 सेकंदाचा व्हिडिओ आतापर्यंत 10 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

VIDEO : दैव बलवत्तर म्हणून... रस्त्यावर सायकल चालवत होती, कारखाली आली; पण...
दैव बलवत्तर म्हणून...
Image Credit source: TV9
| Updated on: Oct 21, 2022 | 7:59 PM

रस्त्यावरुन चालणेही कधी कधी धोकादायक ठरते. बेदरकारपणे गाडी चालवणे, भरधाव वेगात गाडी चालवणे यामुळे रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे रस्त्यावरुन चालतानाही जीव मुठीत घेऊन चालावे लागतेय. अशात लहान मुलांच्या बाबतीत तर खूपच सावधगिरी बाळगण्याची (Take Precautions) आवश्यकता आहे. कधी कधी लहान मुले (Children) पालकांचा डोळा चुकवून खेळता खेळता रस्त्यावर जातात आणि अपघाताच्या घटना घडतात. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on social media) होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सायकल चालवता चालवता कारखाली येते. तिच्या अंगावरुन कार जाते. पण आश्चर्याची बाब म्हणजे अंगावरुन गाडी गेल्यानंतरही चिमुकली सही सलामत कारखालून बाहेर येते.

ही चिमुकली रस्त्यावर सायकल चालवत आहे. याचवेळी समोरुन एक कार येते आणि मुलगी कारच्या समोर येते. मुलगी अचानक समोर आल्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारचे पुढील चाक मुलीच्या अंगावरुन गेले.

इतके होऊनही मुलगी चमत्कारिक वाचलीच नाही तर तिला साधे खरचलेही नाही. कारखालून मुलगी स्वतःहून उठून बाहेर येते आणि निघून जाते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असंच म्हणावं लागेल.

आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ

हा थरारक व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या 9 सेकंदाचा व्हिडिओ आतापर्यंत 10 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच अनेक कमेंट्सही आल्या आहेत.