
‘जॉनी जॉनी येस पापा’ ही कविता लहान मुलांमध्ये बरीच प्रसिद्ध आहे. पण एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक शिक्षिका आपल्या मुलांना त्याची मैथिली आवृत्ती शिकवताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे ही शिक्षिका त्याच्या शिकवण्याच्या अनोख्या शैलीमुळेही चर्चेचा विषय ठरला आहे. मैथिली ही बिहार मध्ये बोलली जाणारी भाषा आहे. ती बिहारी आणि भोजपुरी भाषेचं मिश्रण आहे.
खरंतर हा व्हिडिओ ट्विटरवर ‘एज्युकेटर्स ऑफ बिहार’ या हॅण्डलनं शेअर केला आहे. असे दिसून येतंय की शिक्षिका जॉनी जॉनी येस पापा ची कविता मैथिली भाषेत मुलांना शिकवत आहेत.
इंग्रजी कवितेची मैथिली आवृत्ती पाहून लोक हैराण झाले आहेत कारण शिक्षक ही कविता मुलांना वर्गात अत्यंत अनोख्या पद्धतीने शिकवताना दिसतात.
मुलांना ही कविता समजावी म्हणून आधी शिक्षिका ही कविता म्हणतात, “जॉनी जॉनी” मग मुलं म्हणतात, “मग बाबूजी”… असं छान शिकवणं चालू असतं. यानंतर ही कविता मुलांना पूर्ण व्यवस्थित समजावी म्हणून शिक्षक इंग्रजीतून ही कविता मुलांना शिकवतात.
Hindi version of “johny johny yes papa” pic.twitter.com/lH2drJWQ9h
— Educators of Bihar (@BiharTeacherCan) September 25, 2022
मुलांना या कवितेचा अर्थ नीट लक्षात राहावा म्हणून शिक्षक ही कविता अशा पद्धतीने शिकवत आहेत. प्रत्येक शिक्षकाची आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याची पद्धत वेगळी असली, तरी ही पद्धत व्हायरल होत आहे.