
तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल तर कधी ना कधी तुम्ही ऑप्टिकल इल्यूजन पाहिलंच असेल. ज्यामुळे लोकं अक्षरशः गोंधळून जातात. असेच एक चित्र सध्या लोकांमध्ये चर्चेत आले आहे. ज्यामुळे लोकं प्रचंड गोंधळून गेलेत.
ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटोजचे अनेक प्रकार आहेत. आता व्हायरल होत असलेला हा फोटो पाहा ज्यात फक्त तुम्हाला 9 लिहिलेले आहे आणि या सर्वांमध्ये आणखी एक 8 नंबर दिसेल, पण तो शोधण्यासाठी तुम्हाला तुमचं डोकं चालवावं लागेल.
आपले डोळे आणि डोकं यांचा योग्य प्रकारे वापर करून आपल्याला दुसरा क्रमांक शोधावा लागेल. अनेक युझर्सनीही हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय, पण खरं सांगायचं तर फारच कमी लोक जिनियस ठरले आहेत! एकदा करून बघा, हा भ्रम सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त १० सेकंद आहेत.
Answer
जर तुम्हाला या चित्रातील छुपा क्रमांक आठ सापडत नसेल तर आम्ही तुम्हाला एक छोटीशी हिंट देतो. खालून ९ नंबरची जी लाईन आहे त्यात तुम्हाला हा ८ नंबर दिसेल. हे इतक्या हुशारीने डिझाइन केले गेले आहे की ते डोळ्यांनी सहज पाहणे जवळजवळ कठीण आहे. तुम्हीही हे चित्र तुमच्या ओळखीच्या व्यक्तींशी शेअर करून त्यांची परीक्षा घेऊ शकता.