न विकलेल्या तिकिटाने नशीब फळफळलं, लॉटरी विक्रेताच बारा कोटींचा धनी

| Updated on: Jan 22, 2021 | 1:36 PM

लॉटरीचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी शरफुद्दीन यांच्याकडे एक तिकीट होतं. नेमकं यामध्येच जॅकपॉट लपला होता (Lottery seller won Jackpot)

न विकलेल्या तिकिटाने नशीब फळफळलं, लॉटरी विक्रेताच बारा कोटींचा धनी
Follow us on

तिरुअनंतपुरम : एका रात्रीत मालामाल होण्याचं स्वप्न कोणाचं नसतं? प्रत्येकाचं नशीब एका रात्रीत उजळेल, अशातला भाग नाही. मात्र केरळमधील एका लॉटरी विक्रेत्याचंच नशीब लॉटरीमुळे पालटलं. न विकल्या गेलेल्या लॉटरीमध्येच जॅकपॉट दडला होता आणि हा पठ्ठ्या अक्षरशः रातोरात बारा कोटींचा स्वामी झाला. (Lottery seller won Jackpot by unsold ticket)

46 वर्षांच्या शरफुद्दीनचं नशीब पालटलं

दरवर्षी भारतापासून दुबईपर्यंत आणि सिंगापूरपासून बँकॉकपर्यंत अनेक देशातील नागरिकांना लॉटरीमुळे ‘छप्पर फाड के’ लाभ होतात. तामिळनाडूत राहणारे 46 वर्षांचे शरफुद्दीन इतरांचं नशीब चमकवण्याचं काम करत असत. शरफुद्दीन केरळ सरकारच्या लॉटरीची विक्री करत असत. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्त आयोजित लॉटरीची काही तिकीटं विकली गेली नव्हती.

न विकलेल्या तिकीटातून धनलाभ

लॉटरीचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी शरफुद्दीन यांच्याकडे एक तिकीट होतं. नेमकं यामध्येच जॅकपॉट लपला होता. त्यामुळे न विकलेल्या तिकीटाच्या 12 कोटींच्या बक्षिसाचा धनी शरफुद्दीन झाला.

सौदी रिटर्न शरीफुद्दीनचं संकटमय आयुष्य

शरफुद्दीन तामिळनाडूच्या सीमावर्ती कोल्लम जिल्ह्यातील पोरंबोकमध्ये एका छोटेखानी घरात राहतात. त्यांनी सौदी अरेबियातही काम केलं आहे. शरीफुद्दीन यांचं आयुष्य अनेक संकटांनी भरलेलं आहे. कोरोनाच्या काळात सहा जणांच्या कुटुंबाचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

स्वतःच्या घराचं स्वप्न दृष्टीपथात

कर्ज फेडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. स्वतःच्या मालकीचं घर घेण्याचं स्वप्नही त्यांनी पाहिलं आहे. 2004 ते 2013 या नऊ वर्षांच्या काळात शरीफुद्दीन यांनी सौदीत लहानमोठे उद्योग केले. भारतात परतल्यावर त्यांनी लॉटरी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. याआधीही त्यांना लहान-मोठ्या लॉटरी लागल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच त्यांनी जॅकपॉट जिंकला. (Lottery seller won Jackpot by unsold ticket)

कपातीनंतर नेमकी किती रक्कम मिळणार?

बक्षिसाच्या रकमेतून 30 टक्के कर आणि दहा टक्के एजंट कमिशन कापून शरफुद्दीन यांना बारा कोटींपैकी 7.50 कोटी रुपये बक्षिसाची रक्कम मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

कर्जबाजारी शेतकऱ्याला दुबईत 28.5 कोटींची लॉटरी

दुबईत भारतीयाचं नशीब फळफळलं, बिग तिकिट ‘ड्रॉ’मध्ये तब्बल 24 कोटी रुपये जिंकले

(Lottery seller won Jackpot by unsold ticket)