तिला पाण्यावर चालताना पाहताच लोकांनी जोडले हात, मग सत्य समोर येताच डोक्याला लावला हात, म्हणाले कसा पोपट झाला

'चमत्काराला नमस्कार' हा आपल्या व्यवस्थेचा एक भाग आहे. कोणी काही जादू दाखवला अनेक जण वेडावतात. एक महिला नदीच्या पाण्यावरून जाताना पाहताच अनेक जण विस्मयचकीत झाले. त्यांनी लागलीच हात जोडले. काहींनी त्याचे व्हिडिओ, फोटो काढले. तर काहींना काय करू आणि काय नाही असे झाले. मग जेव्हा खरा प्रकार समोर आला तेव्हा सर्वांनी डोक्याला हात मारला.

तिला पाण्यावर चालताना पाहताच लोकांनी जोडले हात, मग सत्य समोर येताच डोक्याला लावला हात, म्हणाले कसा पोपट झाला
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 4:01 PM

आजकाल सोशल मीडियावर काय दावा करण्यात येईल. काय दिसेल याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी असं काही एडिटिंग करण्यात येत की भले भले तोंडात बोट घालतात. अचानक बागेतील झोपाळे जोरजोरात हलतात. पांढरी साडी घातलेली स्त्री मध्यरात्री एकटीच फिरताना दिसते. स्मशानभूमीत लिंबू हवेत तरंगते, तर काही ठिकाणी हवेत स्त्री तरंगताना दिसते. सोशल मीडियावर कारनामे करणारे कमी नाहीत. असाच एक कारनामा एका पोस्टमध्ये दिसला. समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्यात एक महिला नदीच्या पाण्यावर चालत असल्याचे दिसले. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. मग काय लोकांनी हा चमत्कार असल्याची अवई उठवली. लोकांनी त्या स्त्रीची पूजा सुरू केली. अनेकांनी तिला पाहताच हात जोडले. काहींनी पायावर लोटांगण घेतले. काहींना साष्टांग दंडवत घातला. पण जेव्हा खरा प्रकार समोर आला. तेव्हा त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.

नर्मदा नदीच्या पाण्यावर काय चमत्कार?

एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये ही घटना घडली. येथील नर्मदा नदीच्या पाण्यावर एक वृद्ध महिला पाण्यावरून चालत जात असल्याचा व्हिडिओ एकदम व्हायरल झाला., महिला नदीच्या पाण्यावर चालत जात असल्याच्या चमत्काराचा दावा करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी नदीच्या काठावर महिलेला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. ही चर्चा आसपासच्या गावातही पोहचली. तेव्हा अनेक लोक वाहनं करून नदी काठी धावली. त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. याठिकाणी महिलांची संख्या अधिक होती. काही महिलांनी तर पूजेचे साहित्य मागवले आणि दूरुनच पूजा करायला सुरुवात केली. काहींनी त्या महिलेचा जयजयकार सुरू केला. हा काय चमत्कार आहे हे लोकांच्या लक्षात येईना. अनेकांनी त्याचे फोटो काढले. व्हिडिओ शूट केला.

मग महिलाच आली समोर

ती महिलाच थोड्या वेळाने इतकी गर्दी का जमली ते पाहण्यासाठी समोर आली. ती नदीच्या काठाकडे आली. नर्मदेचे पात्र विस्तर्ण आहे. एका दूरच्या काठावरून लोक ती पाण्यावर चालत असल्याचे पाहत होते. ती थोड्यावेळाने त्या गर्दीकडे पाण्यातून मिळेल तशी वाट काढत पोहचली. ती जवळ येताच लोकांनी देवी माँ म्हणून एकच जयजयकार केला. मग महिलेने हा काही चमत्कार नसल्याचे सांगितले. पात्र विस्तर्ण असल्याने अनेकांना ती पाण्यावर चालत जात असल्याचे वाटले. पण त्या ठिकाणी पाणी अत्यंत कमी असल्याचे त्या महिलेने सांगितले. उन्ह-सावलीच्या खेळामुळे ती पाण्यावर चालत असल्याचा भ्रम अनेकांना झाल्याचे ती महिला म्हणाली.

ही महिला नर्मदा परीक्रमा करत आहे. ती अखेरच्या टप्प्यात या परिसरात होती. ती कमी पाण्यातून जात असताना अनेकांना ती पाण्यावरून चालत जात असल्याचा भास झाला. या महिलेला काही औषधींची माहिती आहे, जी आजारावर आणि हाड मुचकल्यावर प्रभावी ठरतात. तिला आयुर्वेदामधील काही चिकित्सा पद्धतीची माहिती असल्याची माहिती तिने दिली. तिने नर्मदा परिक्रमेत कोणत्या झाडाचा पाला कसा उपयोगात आणायचा याची माहिती दिली. तिने तिथल्या महिलांना आणि लहान मुलांना काही औषधी वनस्पतींची माहिती दिली. तिच्याकडील माहितीच्या खजिन्याने अनेक जण प्रभावित झाले. अनेकांनी ती महिला पाण्यावर चालल्याचा दावा मात्र काही सोडला नाही. तर काहींनी महिला खरी बोलल्याचे कौतुक केले. त्या महिलेला योगा आणि आयुर्वेदातील अनेक लुप्त होणाऱ्या गोष्टींची इतकी माहिती कशी? असा प्रश्नही अनेकांनी त्यावेळी विचारला. ही वृद्ध महिला पुढे मार्गस्थ झाली.