
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरीने आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

जरी ती सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी ती कायम चर्चेत असते. सध्या मात्र महिमा चौधरीपेक्षा जास्त चर्चा तिच्या 18 वर्षीय लेक अरियाना चौधरीची होताना दिसत आहे.

अरियानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिचं सौंदर्य आणि लुक पाहून अनेकांनी तिला नॅशनल क्रश म्हटलं आहे.

अलीकडेच महिमा चौधरी आणि अरियाना चौधरी एकत्र दिसल्या होत्या. दोघींचा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आई-लेकीला एकत्र पाहताच पापाराझींचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले आणि दोघींनीही अगदी हसत-खेळत पोज देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तिचं सौंदर्य सध्या सर्वांना वेड लावत असून तिच्या लुकची जोरदार चर्चा होत आहे. चाहत्यांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.