खऱ्या जगातील खरा हिरो; 5 व्या मजल्यावरुन पडलेल्या चिमुकलीला अलगद झेलले; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 23, 2022 | 1:41 PM

हा व्हिडिओ चिनी सरकारी अधिकारी लिजियान झाओ यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. अवघ्या 13 सेकंदांचा हा व्हिडिओ हृदय हेलावून टाकणारा आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 74 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

खऱ्या जगातील खरा हिरो; 5 व्या मजल्यावरुन पडलेल्या चिमुकलीला अलगद झेलले; व्हिडीओ व्हायरल
Follow us on

नवी दिल्लीः सोशल मीडियावर दररोज हजारो प्रकारचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात, मात्र काही व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकेल. या व्हिडिओमध्ये एका उंच इमारतीवरून खाली पडलेल्या मुलीला एक व्यक्ती अलगदपणे झेलतो. आपण चित्रपटांमध्ये अशी अनेक दृश्ये पाहिली असतील, ज्यामध्ये हिरो लहान मुलांना किंवा छतावरून पडलेल्या लोकांना हिरो वाचवताना दिसून येतो, पण या व्हिडिओमध्ये ‘रिअल लाइफ हिरो’ (Real Life Hero) दिसत आहे.

 

शेन डोंग खऱ्या जगातातील हिरो

हा व्हिडिओ चीनच्या झेजियांग (china zhejiang)  प्रांतातील आहे. माध्यमांनी सांगितलेल्या अहवालानुसार हिरो बनून मुलीला वाचवणाऱ्या व्यक्तीचे नाव शेन डोंग आहे. तो माणूस आपली कार रस्त्याच्या पलीकडे पार्क करत असताना अचानक पाचव्या मजल्यावरील खिडकीतून दोन वर्षांची मुलगी पडताना त्याने पाहिले आणि धावत जाऊन त्याने त्या चिमुकलीचा जीव वाचवला.

चिमुकलीला अलगद झेलले

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक पुरुष आणि एक महिला रस्त्याच्या कडेला उभे आहेत. यादरम्यान अचानक दोघांची नजर वर जाते आणि ते दोघंही पुढं धावतात, त्याच वेळी त्या व्यक्तीचा पायही घसरला आहे, मात्र तो सावरून उभा राहतो न राहतो तोच इमारतीवरुन एक चिमुकली मुलगी खाली पडते, त्या लहान मुलीला ती व्यक्ती अगदी अलगदपणे झेलते, त्या व्यक्तीने त्या मुलीला झेलला नसता तर मोठ अनर्थ घडला असता.

व्हिडीओ 13 सेकंदाचा मात्र…

हा व्हिडिओ चिनी सरकारी अधिकारी लिजियान झाओ यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा 13 सेकंदांचा व्हिडिओ हृदय हेलावून टाकणारा आहे. तोच व्हिडीओ आतापर्यंत 74 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो नागरिकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मुलीचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तीचे वर्णन ‘रिअल हिरो’ असे केले आहे, तर काहींनी ‘खऱ्या जगातील खरा हिरो जे फक्त चित्रपटातच नसतात, तर ते खऱ्या जगातही असतात’ असे लिहिले आहे.