
प्रेम हे आंधळं असतं. प्रेमात अनेकांना धोका पत्करावा लागतो. जगात एका व्यक्तीने तर साऱ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. तो गर्लफ्रेंडसोबत राहात होता. एकाच घरात राहत असताना तो इतर सहा मुलींसोबत रोमान्स करत होता. गर्लफ्रेंडला याची भनकही लागली नाही. पण त्याच्या पाळीव श्वानामुळे सर्व गोष्टी उघड झाल्या. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…
10 वर्षे रिलेशनशीपमध्ये
डॅनी नावाच्या या व्यक्तीने 10 वर्षे आपल्या गर्लफ्रेंडला फसवले आणि एकाच वेळी 6 मुलींशी संबंध ठेवले. डॅनीने स्वतः सांगितले की, तो याला एक खेळासारखे समजत होता आणि यासाठी त्याने एक संपूर्ण यंत्रणा तयार केली होती. यात त्याने रंगीत कॅलेंडर, तीन फोन आणि अगदी एका पोपटाचाही वापर केला. या काळात त्याच्या गर्लफ्रेंडला याची भनकही लागली नाही आणि डॅनी तिच्या पाठीमागे इतर गर्लफ्रेंड्ससोबत रोमांस करत राहिला. पण एका कुत्र्यामुळे त्याचे काळे काम उघड झाले.
वाचा: चंद्र ग्रहणामुळे कोणत्या राशींचा होणार फायदा? कोणत्या राशींवर येणार संकट?
पोपटाचा केला वापर
डॅनी आपल्या सर्व गर्लफ्रेंड्सना व्यवस्थित हाताळण्यासाठी रंगीत कॅलेंडरचा वापर करत होता. वेगवेगळ्या रंगांनी तो ठरवत असे की कोणत्या दिवशी कोणत्या मुलीला भेटायचे. आपल्या फसवणुकीच्या खेळात त्याने एका पोपटालाही सामील करून घेतले होते. त्याने पोपटाला असे शिकवले होते की, जेव्हा त्याच्या फोनवर नोटिफिकेशन येईल किंवा तो खोलीबाहेर जात असते. नंतर पोपट विचित्र आवाज काढायचा. ज्यामुळे त्याच्या गर्लफ्रेंडचे लक्ष फोनवरून हटून पोपटाकडे जायचे. डॅनीची चतुराई इथेच थांबली नाही. त्याने आपल्या गर्लफ्रेंडपासून ही फसवणूक लपवण्यासाठी तीन फोन ठेवले होते. एक फोन तो रोजच्या आयुष्यासाठी वापरत होता, तर बाकीचे दोन फोन तो चिप्सच्या डब्यात आणि बनावट रोपट्यामध्ये लपवून ठेवत होता.
तीन फोनचा वापर
एकदा त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्या फोनवर “ग्रेग्स प्लंबिंग” नावाने सहा मिस्ड कॉल पाहिले. तिला वाटले की घरातील बॉयलर खराब झाला आहे. संशय टाळण्यासाठी डॅनीने स्वतः बॉयलरमधून प्रेशर काढून टाकले आणि तीन दिवस घरात थंड पाणी येऊ दिले. जेव्हा त्याची गर्लफ्रेंड कामावर गेली, तेव्हा त्याने गुपचूप बॉयलर दुरुस्त केला आणि सांगितले की ग्रेगने येऊन सर्व काही ठीक केले आहे. पण डॅनीची सारी चतुराई तेव्हा उघड झाली जेव्हा त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडच्या पाळीव कुत्र्यामुळे त्याची पोल खोल झाली.
सत्य कसे उघड झाले?
डॅनी आपल्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेला होता, जिच्याकडे कॉकापू (cockapoo) जातीचा कुत्रा होता. जेव्हा तो आपल्या पहिल्या गर्लफ्रेंडच्या घरी आला, तेव्हा तो आपल्या कपड्यांवरील कुत्र्याचे केस काढायला विसरला. त्याच्या गर्लफ्रेंडला कुत्रे अजिबात आवडत नव्हते आणि जेव्हा तिने डॅनीच्या कपड्यांवर कुत्र्याचे केस पाहिले, तेव्हा तिला सर्व काही समजले. अशा प्रकारे एका छोट्या कुत्र्यामुळे 10 वर्षांचे खोटे उघड झाले आणि डॅनीचा सारा खेळ खल्लास झाला.