VIDEO | एकाचवेळी दोन सायकली चालवल्या, असा जबरदस्त स्टंट तुम्ही अद्याप पाहिला नसेल, नेटकरी म्हणाले…

व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. तो एकाचं वेळी दोन सायकली रस्त्याने चालवत आहे. अशा स्टंट आतापर्यंत तुम्ही पाहिला नसेल एवढं मात्र निश्चित.

VIDEO | एकाचवेळी दोन सायकली चालवल्या, असा जबरदस्त स्टंट तुम्ही अद्याप पाहिला नसेल, नेटकरी म्हणाले...
Man Doing Stunt On Two Cycles
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 26, 2023 | 1:26 PM

मुंबई : दुनियात आपल्याला रोज नवं टॅलेन्ट (Talent) पाहायला मिळतं. सोशल मीडियामुळं (social media) तर अगदी सोप्प झालंय असं आपण म्हणूया, रोज असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर पडत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात. जो व्हिडीओ लोकांना पाहायला आवडतो. तो व्हिडीओ लोकं पटकन शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओला पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंच झाल्या आहेत. एक व्यक्ती दोन सायकल एकाचवेळी चालवत आहे (Man Doing Stunt On Two Cycles). हा स्टंट करण्यासाठी त्या माणसाने किती प्रॅक्टिस केली असेल हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. तो व्यक्त रस्त्यावरुन सायकल चालवत आहे. हे पाहिल्यानंतर अनेकांनी व्हिडीओला भयानक कमेंट केल्या आहेत.

नेमकं त्या व्हिडीओत काय आहे

व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. तो एकाचं वेळी दोन सायकली रस्त्याने चालवत आहे. अशा स्टंट आतापर्यंत तुम्ही पाहिला नसेल एवढं मात्र निश्चित. सद्या ज्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे, अशा पद्धतीचा स्टंट करणं अनेकांना शक्य नाही. त्याच्यामागे मोठी मेहनत असणार आहे एवढं नक्की. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ ती व्यक्ती दोन हातात दोन सायकली एका गल्लीतून चालवत आहे. त्याचबरोबर तो सायकल पूर्ण नागिन डान्स सारखी चालवत आहे.

 


सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवरती त्या व्हिडीओला it_z_anil_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. त्या व्हिडीओला आतापर्यंत १५ लाखापेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओला खूप लोकांनी पाहिलं आहे, त्याचबरोबर आज सुध्दा त्या व्हिडीओला लोकं अधिक पाहत आहेत.एक नेटकरी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाला की, आपल्या देशात टॅलेन्ट माणसांची अजिबात कमी नाही. एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, हे टॅलेन्ट आपल्या देशातून बाहेर जाता कामा नये, तिसऱ्या व्यक्तीने लिहीले आहे की, अशा पद्धतीने बॅलन्स करणं शक्य नाही. चौथी व्यक्ती म्हणजे हे म्हणजे महाटॅलेन्टचा प्रकार आहे. चुकून जरी पडला तरी त्याला मोठी गंभीर दुखापत होऊ शकते.