Viral Video : त्याने प्रपोज करताच फुटला ज्वालामुखी, नजारा पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल !

असं म्हणतात की जर तुमचे मन शुद्ध असेल तर निसर्गही तुम्हाला आधार देतो. असाच एक प्रसंग सध्या समोर आला आहे. जिथे एका माणसाने त्याच्या प्रेयसीला गुडघे टेकून प्रपोज करताच, त्याच्या मागचं दृश्य पाहण्यासारखं होतं.

Viral Video : त्याने प्रपोज करताच फुटला ज्वालामुखी, नजारा पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल !
अनोखं प्रपोजल व्हायरल
Image Credit source: social media
| Updated on: Aug 21, 2025 | 10:34 AM

प्रेमाचे काही क्षण इतके खास असतात की ते विसरणे अशक्य होऊन जाते. असाच एक अनोखा आणि जादुई क्षण ग्वाटेमालामध्ये पाहायला मिळाला, जेव्हा एका माणसाने त्याच्या प्रेयसीला प्रपोज केले आणि त्याच वेळी त्याच्या मागे जे दृश्य़ दिसलं ते अविस्मरणीय होतं. हे पाहून असे वाटते की निसर्गानेही त्यांच्या प्रेमाला मान्यता दिली. निसर्गाच्या अविष्कारामुळे त्या व्यक्तीचं प्रपोजल खूपच खास ठरलं. लोकांनी देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ जस्टिन ली आणि त्याची प्रेयसी मॉर्गन यांचा आहे. एकमेकांच्या प्रचंड प्रेमात असलेलेल हे दोघं.. आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी जस्टिनने ग्वाटेमाला येथील अकातेनांगो ज्वालामुखीचं हे ठिकाण निवडलं आणि तिथेच त्याने गुडघ्यावर बसून त्याच्या प्रेयसीला प्रपोझ केलं. पण त्याच दरम्यान, जवळच असलेल्या फ्यूगो ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आणि लावा आणि धुराचे लोट आकाशात उडू लागले. जर तुम्ही हाँ व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला समजेल की हे दृश्य एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी नाही. यामुळेच लोक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इथे पहा व्हिडीओ

 

खरंतर या खास क्षणाचा व्हिडिओ 6 जून रोजी पहिल्यांदा शेअर करण्यात आला होता, मात्र 18 ऑगस्टला तो इंस्टाग्रामवर पुन्हा शेअर होताच, तो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. या क्लिपमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, जस्टिनने प्रपोज करताच जणू ज्वालामुखीनेही त्यांच्या प्रेमाचा आनंद साजरा केला. हा व्हिडिओ शेअर करताना मॉर्गनने एक छानशी कॅप्शनमध्ये लिहिली होती. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी, माझा दीर्घकाळचा जोडीदारा, @jleenumbers याने मला ग्वाटेमालामधील अकाटेनांगो ज्वालामुखीवर प्रपोज केले… मागे जो उद्रेक झालेला दिसतोय, तोच फ्यूगो ज्वालामुखी… असं तिने लिहीलं होतं. आम्ही खूप भाग्यवान होतो कारण संपूर्ण दिवसात पहिल्यांदाच आम्हाला असा ज्वालामुखीचा उद्रेक पाहण्याची संधी मिळाली असंही तिने नमूद केलं.

नेटीजन्सनी केलं कौतुक

या अनोख्या व्हिडिओने इंटरनेटवर येताच खळबळ उडवून दिली. लोक या रोमँटिक क्षणाचे खूप कौतुक करत आहेत. हे एखाद्या काल्पनिक पुस्तकातील दृश्यासारखे वाटतंय असं अनेकाचं म्हणणं आहे. असं वायतंय की तो ज्वालामुखी देखील तुमच्यासाठी खूप खुश आहे, अशी कमेंट एकाने केली. नेटीजन्सनी या व्हिडीओवर लाईक्स कमेंट्सची बरसात केली असून त्यावर विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.