मशिदीत चमत्कार! जीव देण्यासाठी त्याने वरून उडी मारली अन्… Video पाहून तुम्हीही व्हाल चकीत!

मशिदीत जीव देण्यासाठी त्याने वरून उडी मारली अन्..., पुढे घडलं तरी काय? मोठा चमत्कार... Video पाहून तुम्हीही व्हाल चकीत! व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मशिदीत चमत्कार! जीव देण्यासाठी त्याने वरून उडी मारली अन्... Video पाहून तुम्हीही व्हाल चकीत!
Saudi Arabia
| Updated on: Dec 26, 2025 | 2:56 PM

कधी कधी असे काही चमत्कार होतात ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. आता देखील असंच काही झालं आहे. गुरुवार, 25 डिसेंबर रोजी, सौदी अरेबियातील मक्का येथील ग्रँड मशिदीत एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने ग्रँड मशिदीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या माणसाने मशिदीच्या वरून उडी मारली. हा आत्महत्येचा प्रयत्न पाहून मशिदीचे सुरक्षा रक्षक ताबडतोब धावत आहे. पवित्र स्थळी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपत्कालीन कारवाई केली.

सध्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कुर्ता-पायजमा घातलेला एक माणूस मशिदीच्या वरून उडी मारताना दिसत आहे. त्याला उडी मारताना पाहून सुरक्षा कर्मचारी लगेच त्याच्या मदतीला धावत आला. अशात दोघांच्या मदतीला इतर लोक देखील धावत आले.

 

 

दोघे गंभीर जखमी

उडी मारलेल्या व्यक्तीसाठी सुरक्षा कर्मचारी धावत आला आणि त्याचे प्राण वाचवले… पण यामध्ये सुरक्षा कर्मचारी आणि व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. सौदी जनरल डायरेक्टरेट ऑफ पब्लिक सिक्युरिटीने या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया हँडल X वर शेअर केला आहे. यामध्ये, परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने कारवाई केल्याबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक करण्यात आले.

दोघांवर उपचार सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचारी आणि उडी मारलेल्या व्यक्तीवर उपचार सुरु आहे. दोघांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. पण आता त्यांची प्रकृती कशी आहे, याबद्दल कोणतील माहिती समोर आलेली नाही.

या प्रकारची घटना यापूर्वी देखील घडली आहे. 2017 मध्ये, सुरक्षा दलांनी काबाजवळ स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सौदी व्यक्तीला रोखले. 2018 मध्ये, ग्रँड मस्जिद कॉम्प्लेक्समध्ये तीन आत्महत्या झाल्याची नोंद झाली, ज्यामध्ये लोकांनी उंचावरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं. 2024 मध्ये आणखी एक घटना घडली, जेव्हा एक माणूस ग्रँड मस्जिदच्या वरच्या मजल्यावरून पडला.