60 वर्ष गायब, 82 व्या वर्षी अचानक सापडली, फक्त दोनच शब्द बोलली… कोण होती? कुठे होती?

1962 मध्ये गायब झालेली ऑड्री बॅकबर्ग 60 वर्षांनंतर सापडली आहे. तिने स्वेच्छेने घर सोडले होते असे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तपास केला आणि कुटुंबाच्या मदतीने तिचा शोध लावला. ती आता सुरक्षित आणि आनंदी आहे आणि कोणताही पश्चात्ताप नाही असे तिने सांगितले आहे.

60 वर्ष गायब, 82 व्या वर्षी अचानक सापडली, फक्त दोनच शब्द बोलली... कोण होती? कुठे होती?
Audrey Backberg
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 7:26 PM

थोडा विचार करा… तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती अचानक गायब झाली तर? अर्थातच तुम्ही काही दिवस त्या व्यक्तीचा शोध घ्याल. पोलिसात जाल, पेपरात, चॅनलवर बातमी द्याल. नातेवाईकांशी संपर्क साधून विचारणा करणार, दोस्त मित्रांनाही विचारणार… एवढं सर्व करूनही ती व्यक्ती अनेक महिने सापडली नाही तर ती या जगात नाही असंच तुम्ही मानाल. कधी कधी अनेक कहाण्या आपल्यासमोर येतात. त्याच्यावर विश्वास करणंही कठिण होऊन जातं. एक अशीच कहाणी आपल्याकडे आली आहे. ऑड्री बॅकबर्गची. ऑड्री 1962 रोजी अचानक घरातून गायब झाली होती. ऑड्री जेव्हा घरातून गायब झाली तेव्हा ती फक्त 20 वर्षाची होती. पण 60 वर्षानंतर असं काही घडलं त्यामुळे सर्वच थक्क झाले. काय घडलं होतं 60 वर्षानंतर?

ही थक्क करणारी घटना आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील एक तरुणी ऑड्री बॅकबर्ग, जी 1962 रोजी घरातून अचानक गायब झाली होती. घरातून गायब झाली तेव्हा ती 20 वर्षाची कोवळी पोर होती. कुटुंबाने तिचा बराच शोध घेतला. पण ऑड्रीची काहीच खबर मिळाली नाही. तिचा शोध घेऊन घरचेच नाही, पोलीसही थकून गेले. हे प्रकरण म्हणजे एक कोल्ड केस बनलं. पण तुम्ही चमत्कार म्हणा की आणखी काही 2024मध्ये ऑड्री अचानक सापडली. म्हणजे तब्बल 60 वर्षानंतर सापडली. 20 व्या वर्षी घरातून गायब झालेली ऑड्री सापडली तेव्हा तिचं वय होतं 82. अत्यंत सुस्थितीत ऑड्री सापडली होती. तिच्या कुटुंबीयांसाठी तर हा एक चमत्कारच होता. 60 वर्षानंतर ऑड्री सापडली. तेव्हा तिने फक्त दोनच शब्द उच्चारले. ते म्हणजे नो रिग्रेट्स… कोणताही पश्चात्ताप नाही.

कुठे होती?

1962मध्ये एक दिवशी कुटुंबातील बेबीसिटरने पोलिसांना सांगितलं की तिने ऑड्रीला मॅडिसन, विस्कॉन्सिपर्यंत लिफ्ट दिली होती. तिथे दोघींनी इंडियानापोलीस, इंडियाना जाणारी ग्रेहाऊंड बस पकडली होती. तिथे गेल्यावर ऑड्री कुठे तरी निघून गेली. त्यानंतर ती परत कधीच दिसली नाही. ऑड्री आपल्या मुलांना सोडून कधीच जाणार नाही, असं तिच्या कुटुंबीयांना वाटत होतं. पण बेबीसिटरची कबुली आणि दस्ताऐवज काही वेगळीच कहाणी सांगत होते. केस हळूहळू थंड बास्नात गेली. पण आशा कायम होती.

2024च्या सुरुवातीला सॉक काउंटी शेरिफ ऑफिसने ही कोल्ड केस पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला. आयजॅक हॅनसन या डिटेक्टिव्हकडे केसची जबाबदारी दिली गेली. जुने दस्ताऐवज पाहून अत्यंत सखोल तपासणी करण्यात आली. साक्षीदारांना पुन्हा साक्ष देण्यासाठी बोलावलं. डिजिटल रेकॉर्ड्स शोधण्यात आले. ऑड्रीचं लग्न वयाच्या 15 व्या वर्षी रोनाल्ड बॅकबर्ग याच्याशी झालं. या लग्नावर ती बिलकूल खूश नव्हती. ऑड्री कौटुंबिक छळ आणि मेंटल टॉर्चरखाली होती, असं तपासात दिसून आलं.

असा लागला शोध

ऑड्रीच्या बहिणीने तयार केलेलं Ancestry.com हे अकाऊंट या केससाठी टर्निंग पॉइंट ठरलं. डिटेक्टिव्ह हॅनसने डीएनए मॅच करून ऑड्री जिवंत असल्याची शक्यता ट्रॅक केली. त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून एका पत्त्याची पुष्टी केली. त्यानंतर 10 मिनिटाने त्या पत्त्यावर राहणाऱ्या एका महिलेने डिटेक्टिव्हला फोन केला. दोघांमध्ये 45 मिनिटं बोलणं झालं. त्यावेळी ऑड्रीने आपणच हरवलेली ऑड्री असल्याचं कबूल केलं. माझ्या इच्छेनेच मी सर्व काही सोडून निघून गेले होते, असंही तिने स्पष्ट केलं.

उत्तर होतं…

इतक्या वर्षानंतर तुला काही पश्चात्ताप वाटतोय का? असं तिला विचारण्यात आलं. त्यावर तिने दोनच शब्दात उत्तर दिलं. नो रिग्रेट्स. माझ्या आयुष्यात मी जो काही निर्णय घेतला, तो माझ्यासाठी योग्यच होता. आता मी केवळ सुरक्षित नाही तर खूशही आहे, असं तिने स्पष्ट केलं. त्यानंतर सॉक काउंटीचे शेरिफ चिफ मास्टरने एक निवेदन जाीर केलं. ऑड्री जिवंत आहे. एका वेगळ्या राज्यात ती सुखाचं आयुष्य जगत आहे. ती स्वेच्छेने घर सोडून गेली होती. यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडलेला नाही आणि कोणतंही षडयंत्र नाही, असं या निवेदनात म्हटलं होतं.