AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलच्या रूममध्ये विचित्र वास, बेडखाली पाहिलं तर लुकलुकले दोन डोळे… त्या रात्री एका मुलीसोबत नेमके काय घडले?

Stranger in Hotel Room : एका मुलीला हॉटेलमध्ये आलेला अनुभव अंगावर शहारे आणणारा ठरला. तिने टिकटॉक या सोशल साईटवर तिचा तो भयावह अनुभव सांगितला. तिच्या एका सतर्कतेमुळे, सजगतेमुळे तिने स्वत:ची अशी सुटका करून घेतली.

हॉटेलच्या रूममध्ये विचित्र वास, बेडखाली पाहिलं तर लुकलुकले दोन डोळे... त्या रात्री एका मुलीसोबत नेमके काय घडले?
त्या रात्री काय घडलेImage Credit source: गुगल
| Updated on: May 06, 2025 | 4:58 PM
Share

पर्यटनाची आवड असणार्‍या त्या मुलीसोबत हॉटेलमध्ये असे काही घडेल, जे तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. या रूमची किल्ली तिच्याकडे होती. या हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक पण होते. ती मुलगी रूममध्ये अगदी बिनधास्त होती. पण महिलांना जात्याच एक सहावी संवेदना असते म्हणतात. तिला सारखं रुममध्ये कोणीतरी असल्याचा भास होत होता. मनाची घालमेल कमी न झाल्याने तिने खातरजमा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

जपानमधील तो धक्कादायक प्रकार

ही गोष्ट आहे नतालीसा ताकसिसी नावाच्या मुलीची, ती सुट्ट्या घालवण्यासाठी एका सोला ट्रिपवर बाहेर पडली होती. थायलंड येथील राहणारी नतालीसा हिने सुट्ट्या घालवण्यासाठी जपान या देशाची निवड केली. ती एप्रिल महिन्यात एकटीच फिरायला जपानमध्ये पोहचली. तिने टोकियो या शहरात एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. ती फ्रेश झाली. सामान रूममध्ये ठेवून फिरायला गेली.

पहिल्या दिवशी तिने जपानचे सौंदर्य, निसर्ग आणि पर्यटनस्थळी धमाल केली. तिने टिकटॉकवर तिचे व्हिडिओ शेअर केले. जपानमधील लोकप्रिय दैनिक द पीपुलच्या वृत्तानुसार, ती संध्याकाळी जवळपास 7:30 वाजता हॉटेलमध्ये परतली. या हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक होते. हॉटेल स्टॉफ पण संख्येने अधिक होता. Key Card आधारे तिच्या रूममध्ये ती दाखल झाली.

…आणि तो तिच्याकडे एकटक पाहत होता

नतालीसा रूममध्ये आली. ती अगोदर फ्रेश झाली. तिने रात्रीचे कपडे परिधान केले. ती बेडवर पडली. पण तिला आता काही तरी विचित्र वाटू लागले. एक विचित्र वास तिला आला. तिला वाटले हॉटेलच्या बेडवरील चादरीचा हा वास असावा. पण तिचा अंदाज चुकला. तिला हा वास बेड खालून येत असल्याचे जाणवले.

तिने खाली वाकून पाहताच, तिचे डोळे चमकले, अंगावर काटा आला. एक शिरशिरी आली. तिने जोरात किंचाळी फोडली. तिने रुमचा दरवाजा उघडून आरडाओरड केली. तिच्या बेडखाली एक पुरूष लपला होता. तो बाहेर आला आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला.

कर्मचारी धावले. पोलिसांना फोन करण्यात आला. पोलीस दाखल झाले. त्यांनी बेड खालून त्या व्यक्तीची एक पॉवर बँक आणि युएसबी केबल जप्त केली. हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्था चोख असताना, ही व्यक्ती एका रूममध्ये कशी घुसली हाच चर्चेचा विषय ठरला. पोलिसांनी हॉटेल स्टाफची चर्चा केली. नतालीसाने या घटनेचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकला. हॉटेलने तिला सर्व रक्कम परत केली आणि तिची माफी मागितली. पण ती एका मोठ्या संकटातून वाचली हे मात्र नक्की.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.