Baba Vanga Prediction : या वर्षी जगावर मोठे आर्थिक संकट, खरं होणार बाबा वेंगाचे ते भाकीत? कुणाच्या हाती कटोरा येणार?
Economic Disasters : गेल्या काही दिवसांपासून बुल्गेरियाची भविष्यवक्ता बाबा वेंगाच्या भाकिताची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी वर्ष 2025 साठी एक महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी आता खरी ठरू पाहत आहेत. कुणाच्या हाती कटोरा येणार?

जगातील शेअर बाजारात मोठी उलथापालथ होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर एका मागून एक संकट येत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने टॅरिफ वॉर सुरू केल्यामुळे जगावर मोठे आर्थिक संकट येऊ घातले आहे. त्यातच भूराजकीय संकटामुळे अनेक देशात महागाई वाढली आहे. आयातीवर निर्भर असलेल्या देशांची अवस्था वाईट आहे. गेल्या काही दिवसांपासून बुल्गेरियाची भविष्यवक्ता बाबा वेंगाच्या भाकिताची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी वर्ष 2025 साठी एक महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी आता खरी ठरू पाहत आहेत. कुणाच्या हाती कटोरा येणार?
बाबा वेंगाच्या भाकिताची चर्चा
बाबा वेंगाने या वर्षासाठी 2025 साठी जगाला एक मोठा इशारा दिला आहे. त्यानुसार जगावर युद्धाचे ढगच नाही तर आर्थिक विवंचनेचे ढग सुद्धा जमा होत आहे. एका नंतर एक संकट येऊ घातली आहेत. रशिया-युक्रेन युद्ध, हमास-इस्त्रायल युद्ध, भारत-पाकिस्तानमधील तणाव, अमेरिकेचे टॅरिफ वॉर यामुळे आर्थिक आघाडीवर मोठी खळबळ उडालेली आहे. त्याचा फटका गरीब राष्ट्रांसोबतच विकसनशील आणि विकसीत राष्ट्रांना सुद्धा बसणार आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने गोंधळ
5 एप्रिल रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारात एक मोठे पाऊल टाकले. त्यांनी भारतासह अनेक देशावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्यांनी या दिवसाला मुक्ती दिवस म्हणून जाहीर केले. चीनवर 34 टक्के, युरोपीय संघावर 20 टक्के, मॅक्सिको आणि कॅनडावरील अनेक उत्पादनावर 25 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावला.
तर दुसरीकडे चीनने सुद्धा जशाच तसे उत्तर दिले. चीनने आक्रमक भूमिका घेतली. बीजिंगने अमेरिकेतील वस्तूंवर 34 टक्के टॅरिफ लावण्याचे जाहीर केले. त्यामुळे नाराज ट्रम्पने चीनला कर धोरण न बदलल्यास अजून कर लावण्याचा इशारा दिला. पण चीन काही बधला नाही. त्यामुळे चीनवर अमेरिकेने एकूण 104 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले. सध्या तीन महिन्यांसाठी या धोरणाला स्थगिती देण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या हाती कटोरा?
गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. पाकिस्तान कर्जावर जिवंत आहे. उधारीवर पाकिस्तान सरकारचे काम सुरू आहे. अनेक देशांनी पाकिस्तानला मदत करण्यास नकार दिला आहे. आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याने भारताने जागतिक नाणेनिधीकडे पाकिस्तानला कोणतीही मदत देण्यास हरकत घेतली आहे. त्यामुळे युद्ध जर झाले तर पाकिस्तानची अवस्था घर का ना घाटका, अशी होणार आहे.
डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.
