तीळांचे महत्त्व जाणून घ्या! या 5 ठिकाणी तीळ असतील, तर…

तुमच्या गळ्यावर तीळ असेल तर तुम्ही भरपूर दागिने घालाल असंही म्हटलं जातं. तीळ आपले नशीब ठरवतात, असाही अनेकांचा समज असतो.

तीळांचे महत्त्व जाणून घ्या! या 5 ठिकाणी तीळ असतील, तर...
moles
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 06, 2022 | 10:07 AM

अनेक जण शरीरावर तीळाला सौंदर्याशी जोडतात. तसेच तुमच्या गळ्यावर तीळ असेल तर तुम्ही भरपूर दागिने घालाल असंही म्हटलं जातं. तीळ आपले नशीब ठरवतात, असाही अनेकांचा समज असतो. शरीराच्या ठराविक भागावर तीळ असतील तर त्याने नेमकं काय होतं अशाही गोष्टी बोलल्या जातात. चला तर मग बघुयात तुमच्या कोणत्या अवयावर तीळ आहे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो.

डोळ्यात तीळ असणारे लोकं प्रेमाच्या बाबतीत भावनिक आणि नाजूक असतात. उजव्या डोळ्यावर तीळ असलेले लोक स्वतःवर विसंबून नसतात. ते इतरांच्या मदतीवर अवलंबून असतात.

जर तुमच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

अंगठ्यावर तीळ असेल तर तुम्ही खरंच नशीबवान आहात. अंगठ्यावर तीळ असलेले लोक अतिशय हुशार आणि बुद्धिमान मानले जातात.

तर्जनी म्हणजेच अंगठा आणि मधल्या बोटाच्या मध्ये असणारं बोट. या बोटावर तीळ असणं म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसे असू शकतात.

पण तुम्हीही काळजी घेणं गरजेचं आहे कारण असं म्हटलं जातं की, ज्यांच्याकडे तर्जनीवर तीळ आहे, त्यांचे शत्रूही खूप असतात.

डाव्या गालावर तीळ असलेल्या लोकांच्या मोठ्या इच्छा असतात. या लोकांना आपल्या आयुष्यात खूप काही करायचे आहे आणि बदलत्या काळानुसार नवीन गोष्टींचा शोध घेत राहायचे आहे. या लोकांचा मेंदूही खूप वेगवान असतो.