Video : अय्यो.. तुम्ही तर असं नाही करत ना लोकलमध्ये? बघा! यानं काय केलं?

| Updated on: Jun 14, 2022 | 3:10 PM

ज्या एकाचं लक्ष मोबाईलमध्ये नसतं, तो काय करत असतो? तो लोकं मोबाईलमध्ये काय करत आहेत, हे बघत असतो.

Video : अय्यो.. तुम्ही तर असं नाही करत ना लोकलमध्ये? बघा! यानं काय केलं?
तुमच्यासोबतही असं झालंय का..?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मुंबईच्या लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना मोबाईल फोन सर्रास वापरला जातो. गाडीत दहा प्रवासी असतील, तर त्यापैकी नऊ जणांची डोकी ही मोबाईल फोनमध्ये (Mobile Phone) घुसलेली असतात. पण ज्या एकाचं लक्ष मोबाईलमध्ये नसतं, तो काय करत असतो? तो लोकं मोबाईलमध्ये काय करत आहेत, हे बघत असतो. अशावेळी काही जण तर फारच बेशिस्त असतात. तुम्ही एखाद्यासोबत चॅटिंग करत असता. तुमचे चॅट (Chat) शेजारचा प्रवासी तिरक्या नजरेनं वाचताना दिसला, तर आश्चर्य वाटायला नको. आता हा नैसर्गिक स्वभाव जरी असला, तर हा गुण काही चांगला नाही. चोरुन चोरुन दुसऱ्याचे चॅट वाचण्याची काही रेल्वे प्रवाशांना तर खास सवयच असते. अशा लोकांला डेडीकेट केलेला एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियात व्हायरल झाला. नेमकं यावेळी घडतं काय? याचं तर एक खरंखुरं प्रात्यक्षिकच एका मुलीनं करुन दाखवलंय.

काय दिसतं व्हिडीओमध्ये?

एक मुलगी लोकलमधून प्रवास करते. तिच्या बाजूला एक मुलगा बसला. ती मोबाईलमध्ये कुणाशी तरी चॅटिंग करते. शेजारी बसलेला मुलगा तिचं चॅटिंग पाहण्याचा प्रयत्न करतोय. तिरक्या डोळ्यानं कधी, नजर चुकवून मध्येच थोडं मागे होऊन, मोबाईलमध्ये नेमकं काय चॅटिंग केलं जातंय, हे पाहण्याचा प्रयत्न हा मुलगा करताना दिसतो.

हे सुद्धा वाचा

मुलीनं पाहिलं की तो लगेच दुसरीकडे मान वळवायचं. आपण त्या गावचेच नाही, असं भासवण्याचा प्रयत्न करायचा. पण एका क्षणाला मुलीलाही संशय येतो. एकदा दोनदा ती दुर्लक्ष करतो. पण तिसऱ्यांदा मुलीला हे कळतंच. यानंतर जे होतं, ते खरंतर तुम्ही या व्हिडीओमध्येच पाहायला हवं…

बघा नेमकं काय घडलं..?

मराठी फनी रील्स या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वृषाली जावळे या डिजीटल कंटेट क्रीएटरने हा व्हिडीओ शेअर केला होता. मुंबई लोकलमधले असेच काही इंटरेस्टिंग व्हिडीओही वृषालीने शेअर केलेत.

फोर्थ सीट मिळाल्यावर काय होतं? पाहा..

लोकलमध्ये अनेकदा प्रवासी व्हिडीओ पाहत असतात. कुणी चॅटिंग करत असतं. कुणी आपली इतर कामं करत असतं. तर कुणाचे आणखी काय काय उद्योग सुरु असतात. पण काही निर्लज्ज प्रवाशांना शेजारच्या प्रवाशाच्या मोबाईलमध्ये काय चाललंय, यात डोकं खुपसल्याशिवाय त्यांना शांती मिळत नाही. अशा सगळ्या प्रवाशांना वृषालीने आपल्या व्हिडीओत टोला लगावलाय.