समुद्रात सापडला गूढ मासा, दात पाहून शास्त्रज्ञ म्हणाले- हा राक्षस आहे

हिंद महासागराच्या एका दुर्गम भागात पाण्याखालील खोल समुद्रातील माशांचा एक विचित्र प्रकार सापडला आहे. त्यात अनेक विचित्र मासे आहेत, ज्यांना पाहून शास्त्रज्ञ ही थक्क झाले. काही मासे दिसायला इतके विचित्र आणि खतरनाक आहेत.

समुद्रात सापडला गूढ मासा, दात पाहून शास्त्रज्ञ म्हणाले- हा राक्षस आहे
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 6:36 PM

हिंद महासागराच्या एका दुर्गम भागात पाण्याखालील ज्वालामुखीजवळ खोल-समुद्रातील शास्त्रज्ञांना माशांचा एक विचित्र गट सापडलाय. ज्यामध्ये अनेक विचित्र मासे दिसत आहेत. ज्यांना पाहून सगळेच थक्क झालेत. ऑस्ट्रेलियातील म्युझियम व्हिक्टोरिया रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांना तीक्ष्ण दात आणि सरड्यासारखा दिसणारा मासा सापडला आहे.  ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम कोकोस (कीलिंग) आयलँड्स मरीन पार्कच्या मोहिमेदरम्यान हा मासा सापडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला पर्थच्या वायव्येस सुमारे 1,708 मैल (2,750 किलोमीटर) 290,213 चौरस मैल (467,054 चौरस किलोमीटर) क्षेत्रात हा मासा आढळला आहे .

या प्रदेशात पांढऱ्या वाळूचे किनारे आहेत. सरोवरांसह 27 लहान बेटांचा समावेश आहे. येथून तीन मैलांपेक्षा जास्त खोल समुद्रातून हे नमुने गोळा करण्यात आले आहेत. इतक्या खोल आढळलेल्या या अज्ञात प्राण्याचे भितीदायक दात आणि विचित्र डोळे पाहून संशोधकांना भुरळ पडलीये.

येथे त्यांना एक सपाट मासाही सापडला आहे. डोळे त्याच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला आहेत. खोल समुद्रातील बॅटफिश देखील सापडली आहे. जे आपल्या हाताच्या पंखांचा वापर करून समुद्रतळावर रेंगाळतात.

Sloane च्या Viperfish चेहऱ्याचा आकार खूप भितीदायक असल्याने लोक आश्चर्यचकित झालेत. म्युझियम व्हिक्टोरिया रिसर्च इन्स्टिट्यूटमधील मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ टिम ओ’हारा यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले की, ‘हे मासे खोल समुद्रातील फॅशन स्टार्सपेक्षा कमी नाहीत.’ ते पुढे म्हणाले, ‘खोल समुद्रातील मासे सर्व आकारात येतात, ते हलके, पारदर्शक आणि मोठे डोळे असणारे असतात. प्रत्येक प्रजाती खोल समुद्राच्या वातावरणात अत्यंत अनुकूल आहे. आम्ही या सागरी उद्यानात राहणाऱ्या नवीन प्रजातींची आश्चर्यकारक संख्या शोधली आहे.’

समुद्राच्या खोलवर अनेक असे जीव राहतात ज्यांचा शोध अजून लागलेला नाही. अनेक जीव अजूनही जगाला परिचित नाहीत. समुद्राच्या खोलीत अनेक असे जीव आहेत ज्यांच्यापर्यंत सुर्यप्रकाश देखील पोहोचू शकत नाहीत. अशा वातावरणात ते राहतात. समुद्रात आतापर्यंत अनेक जीवांचा शोध लागला आहे. ऑस्ट्रेलियातील एका रिचर्स सेंटरला आता हा नवा शोध लागला आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.