एनसीबीचे अधिकारी ‘मन्नत’वर धडकले, नेटकऱ्यांचा शाहरुखला पाठिंबा, #ShahRukhKhan, #Mannat ट्रेंडिंगवर

नेटकऱ्यांनी फेबसूक, ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर शाररुख खान तसेच मन्नत ट्रेंडिंगला आहेत. तसेच काही नेटकरी एनसीबी टीमच्या कारवाईवरदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही नेटकरी तसेच फॅन्सने शाहरुखसाठी प्रार्थना केली आहे. सध्या तुम्ही अडचणीत आहात. पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे एका नेटकऱ्यांने म्हटले आहे.

एनसीबीचे अधिकारी मन्नतवर धडकले, नेटकऱ्यांचा शाहरुखला पाठिंबा, #ShahRukhKhan, #Mannat ट्रेंडिंगवर
shah rukh khan
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 4:07 PM

मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्ररणामध्ये चौकशी तसेच तपासणी करण्यासाठी एनसीबीची टीम आज शाहरुख खानचे घर म्हणजेच मन्नतवर जाऊन पोहोचली. यावेळी एनसीबीने शाहरुख खानची मॅनेजर पूज ददलानीला एक नोटीस दिल्याचे म्हटले जात आहे. या नोटिशीत आर्यन खानची शैक्षणिक माहिती तसेच मेडिकल हिस्ट्रीसुद्धा मागण्यात आली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता सोशल मीडियावरील वातावरणदेखील चांगलेच तापले आहे. एनसीबीची टीम मन्नतवर पोहोचल्यामुळे नेटकरी आता शाहरुख खानला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुढे आले आहेत.

शाहरुखसाठी नेटकऱ्यांची प्रार्थना, म्हणतात सगळं ठीक होईल

नेटकऱ्यांनी फेबसूक, ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर शाररुख खान तसेच मन्नत ट्रेंडिंगला आहेत. तसेच काही नेटकरी एनसीबी टीमच्या कारवाईवरदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही नेटकरी तसेच फॅन्सने शाहरुखसाठी प्रार्थना केली आहे. सध्या तुम्ही अडचणीत आहात. पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे एका नेटकऱ्यांने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने काही दिवसांनी सगळं काही ठीक होईल, असा विश्वास व्यक्त केलाय. तसेच एका नेटकऱ्याने सत्य लवकरच बाहेर येईल असं सांगितलं आहे.

दरम्यान सध्या सोशल मीडियावर #ShahRukhKhan, Mannat हे हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहेत. तसेच यामध्ये अनन्या पांडेदेखील ट्रेंडिंगवर असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एनसीबीने अनन्या पांडेला चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.

इतर बातम्या :

मेळावे आणि चित्रा वाघांना प्रत्युत्तर यापलीकडे चाकणकरांनी महिलांसाठी काय केलं? शालिनी ठाकरेंना सवाल

‘मंत्रालय बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी लुटत होते’, सोमय्यांचा पुन्हा मुश्रीफांवर घणाघात; राजीनाम्याचीही मागणी

जुन्या वादातून मित्रांमध्ये राडा, नागपुरात चौघांकडून तरुणाची चाकू भोसकून हत्या